आपल्या स्मार्टवॉच मध्ये ऑन-डिमांड ECG फीचर सादर करेल Google
गूगल Alphabet च्या हेल्थ डिवीजनच्या स्मार्टवॉचसाठी ऑन-डिमांड ECG फीचर मिळणार आहे. यासाठी कंपनीला क्लियरन्स मिळाले आहे. कंपनीचा उद्देश्य एका वियरेबल डिवाइस वर चांगला हेल्थ डेटा उपलब्ध करवून देण्याचा आहे.
महत्वाचे मुद्दे:
- फीचर साठी FDA 510(k) चे मिळाले क्लियरन्स
- सिंगल चॅनल ECG रिदम दिसेल या फीचरमुळे
- Google ची पॅरेन्ट कंपनी आहे अल्फाबेट
गूगलची पॅरेन्ट कंपनी अल्फाबेटच्या हेल्थ डिवीजनला आपल्या "स्टडी स्मार्टवॉच" मध्ये आता लवकरच ऑन-डिमांड ईसीजी फीचर मिळणार आहे. स्मार्टवॉच मध्ये या फीचर साठी हेल्थ डिवीजन Verily ला FDA 510(k) चे क्लीयरेंस मिळाले आहे. हा स्मार्टवॉच टेस्ट प्लॅटफार्म म्हणून वापरला जात आहे. असे करण्यामागचे कारण म्हणजे कंपनीला एका वियरेबल डिवाइस वर बेस्ट हेल्थ डेटा कशाप्रकारे जमा केला जाऊ शकतो यावर रिसर्च करता यावा.
आपल्या डिवाइसच्या माध्यमातून कशाप्रकारे लोकांपर्यंत हेल्थ सेंटर पोहोचवावा यावर Apple नंतर आत Google ची पॅरेन्ट कंपनी Alphabet काम करत आहे. The Verge नुसार टेक जाईंट Google चा हा स्टडी स्मार्टवॉच दोन वर्षांपूर्वीच समोर आणण्यात आला होता. रिपोर्ट नुसार या स्मार्टवॉच मध्ये आधीपासूनच ECG फीचर होता. पण याला अजूनपर्यंत FDA क्लियरन्स मिळाले नव्हते जे आता मिळाले आहे.
सध्या या ईसीजी वॉचचे फीचर टेस्ट करण्यासाठी हे रिकॉर्ड, स्टोर, ट्रांसफर आणि सिंगल ECG रिदम डिस्प्ले कारण्यासंबंधित प्रयोग केले जातील. त्यानंतर हे फीचर इतर वियरेबल डिवाइसेस मध्ये दिले जाऊ शकतात. तसे पाहता हे फीचर आता अनेक डिवाइसेस मध्ये येत आहे आणि आता हि सर्व सामान्य बाब झाली आहे. विशेष म्हणजे FDA चे क्लियरन्स Class II डिवाइसच्या अक्युरेसीशी संबंधित नाही पण एफडीए ने याला अप्रूवल देण्या मागचे कारण म्हणजे हा वापरासाठी सुरक्षित आहे.