गूगल ने डूडल च्या माध्यमातून साजरी केली Georges Lemaitres यांचा 124वी जयंती

Updated on 17-Jul-2018
HIGHLIGHTS

डूडल मध्ये Lemaitres यांना सतत वाढत असलेल्या यूनिवर्स च्या सेन्टर मध्ये दाखवण्यात आले आहे ज्याचा त्यांनी सर्वात आधी अभ्यास केला होता.

Google Celebrates Georges Lemaitres’s 124th Birthday through Doodle: आज गूगल डूडल च्या माध्यमातून Georges Lemaitres यांची 124वी जयंती साजरी करत आहे, जे त्यांच्या बिग बँग थ्योरी बद्दल च्या अनुमानांसाठी ओळखले जातात. 

डूडल मध्ये Lemaitres यांना सतत वाढत असलेल्या यूनिवर्स च्या सेन्टर मध्ये दाखवण्यात आले आहे ज्याचा त्यांनी सर्वात आधी अभ्यास केला होता. 
Lemaitres यांचा जन्म इसवी सन 1894 मध्ये झाला होता त्यांनी कँब्रिज यूनिवर्सिटी, हार्वर्ड यूनिवर्सिटी, आणि MIT मधून भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतले होते. Lemaitre ने सांगितले होते की ब्रम्हांडाची सुरवात एका अणूच्या स्वरुपात झाली होती ज्याला त्यांनी कॉस्मिक एग चे रूप दिले होते. 

1936 मध्ये Lemaitres यांची पोंटीफिकल अकॅडमी ऑफ सायन्स चे सदस्य म्हणून निवड झाली होती तसेच 1941 मध्ये त्यांची रॉयल अकॅडमी ऑफ साइंस एंड आर्ट्स ऑफ बेल्जियम चे सदस्य म्हणून पण निवड झाली होती. 20 जून 1966 ला त्यांचे निधन झाले. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :