प्रतीक्षा संपली! Google च्या मेगा लाँच इव्हेंटची घोषणा, Pixel 9 सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच  

प्रतीक्षा संपली! Google च्या मेगा लाँच इव्हेंटची घोषणा, Pixel 9 सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच  
HIGHLIGHTS

Made by Google हा Google च्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी एक आहे.

कंपनीने Google च्या अधिकृत X हँडलद्वारे ‘Made by Google’ इव्हेंटची घोषणा केली.

Google Pixel 9 सिरीजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे.

Made by Google: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google ने अखेर आपल्या मेगा ‘Made by Google’ इव्हेंटची घोषणा केली आहे. Made by Google हा Google च्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी एक आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आगामी Google Pixel 9 सीरीज आणि स्मार्टवॉच सादर करू शकते. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या नेहमीच्या लाँच टाइमलाइनपेक्षा खूप पुढे आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये त्याचा मेगा लाँच इव्हेंट आयोजित करते. ही सिरीज विद्यमान Google Pixel 8 मालिकेची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात संपूर्ण तपशील-

Also Read: अप्रतिम ऑफर! OnePlus Nord CE4 Lite 5G ची भारतात आज पहिली सेल, 50MP कॅमेरासह मिळतील भारी फीचर्स

Made by Google इव्हेंटची लाँच डेट

कंपनीने Google च्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे ‘Made by Google’ इव्हेंटची घोषणा केली आहे. येत्या 13 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कंपनी आपले नवीनतम Pixel फोन लाँच करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यासोबतच Google AI आणि अँड्रॉइड सॉफ्टवेअर अपडेटशी संबंधित काही घोषणा केल्या जाणार आहेत.

Google Pixel 9 सिरीज

Google ची आगामी स्मार्टफोन नंबर सिरीज म्हणजेच Pixel 9 सिरीज बऱ्याच काळापासून लीकचा भाग आहे. या सिरीजमध्ये, कंपनी तीन स्मार्टफोन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. आगामी सिरीजअंतर्गत Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 XL फोन समाविष्ट असतील. Pixel 9 Pro XL फोन Pixel 8 Pro फोनचा सक्सेसर असणार आहे. Pixel 9 Pro ही या लाइनअपची नवीन आवृत्ती असेल. हा फोन कॉम्पॅक्ट एडिशनमध्ये सादर केला जाईल.

Google Pixel 9 Pro XL

Google Pixel 9 सिरीज फोनबद्दल अधिक लीक्स पुढे आले आहेत. त्यानुसार, Pixel 9 मध्ये 6.03 इंच लांबीचा फ्लॅट डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. तर, दुसरीकडे कंपनी प्रो मॉडेलमध्ये 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले देणार आहे. Pixel 9 Pro XL फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील असेल. यासह तुम्हाला फोनमध्ये टेलेफोटो सेंटरदेखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo