मोबाईल निर्माता कंपनी जिओनी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन W909 Clamshell लाँच करु शकतो. खरे पाहता कंपनी 29 मार्चला एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, ज्यासाठी कंपनीने निमंत्रण पाठवणेही सुरु केले आहे.आशा आहे की, कंपनी ह्या कार्यक्रमात आपला नवीन फोन W909 Clamshell लाँच करु शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या फोनमध्य फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकतो, त्याचबरोबर ह्यात 4GB ची रॅमसुद्धा आहे. ह्याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने ह्या फोनमध्ये हेलिओ P10 (MT6755) प्रोसेसर आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. ह्या अंतर्गत स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये दोन टच डिस्प्ले असण्याचा दावासुद्धा केला आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये T9 कीबोर्ड असल्याचीसुद्धा माहिती मिळत आहे.
हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग Video
तर काही रिपोर्टमध्ये असाही दावा केला आहे की, ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल. ह्या स्मार्टफोनची किंमत जवळपास ३७,००० (CNY 3,599) असू शकते. ह्या फोनच्या लाँच आणि किंमतीविषयी सर्वात आधी PhoneRadar ने माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा – मायक्रोमॅक्स सरफेस प्रो 3 टॅबलेटच्या किंमतीतही झाली घसरण, ५८,९९० रुपयात उपलब्ध
हेदेखील वाचा – वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट