मोबाईल निर्माता कंपनी जिओनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 प्लस बाजारात लाँच करणार आहे. अलीकडेच कंपनीने मॅरेथॉन M5 स्मार्टफोनला भारतात लाँच केले होते.
सध्या तरी अशी माहिती मिळतेय की, मॅरेथॉन M5 प्लस स्मार्टफोन २१ डिसेंबरला चीनमध्ये सादर करेल. ही माहिती फोनरेडारने दिली आहे. प्राप्त केलेल्या माहितीनुसार, फोनच्या बॅटरीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जेथे मॅरेथॉन M5 मध्ये 6020mAh ची ड्यूल बॅटरी दिली गेली आहे, तिथे मॅरेथॉन M5 प्लसमध्येसुद्धा हीच बॅटरी उपलब्ध होईल.
कंपनीने ह्या नवीन स्मार्टफोनच्या लाँच कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. निमंत्रणानुसार कंपनी २१ डिसेंबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. सध्यातरी ह्या निमंत्रणामध्ये डिवाइसविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र आशा आहे की, ह्या कार्यक्रमात कंपनी मॅरेथॉन M5 प्लस स्मार्टफोनला लाँच करु शकते.
जिओनी मॅरेथॉन M5 प्लस स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080 पिक्सेल असेल. ह्यात मिडियाटेक एमटी 6735 क्वाडकोर प्रोसेसरसुद्धा असेल. त्याचबरोबर ह्यात 3GB रॅमसुद्धा असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 32GB चे अंतर्गत स्टोरेज असू शकते.