जिओनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 प्लस लाँच केला आहे. ह्या डिवाइसची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 5020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याची किंमत २६,९९० रुपये आहे. मुंबईतील एक नामांकित रिटेलरने ह्या फोनच्या लाँचविषयी माहिती दिली आहे. कंपनीसुद्धा भारतात लवकरच हा फोन अधिकृतरित्या लाँच करेल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 6 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. हा AMOLED डिस्प्ले आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 368ppi आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. मॅरेथॉन M5 प्लस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित जिओनीच्या अमिगो 3.1 ओएसवर चालेल.
हेदेखील वाचा – आकर्षक डिझाईन्समुळे हे स्मार्टफोन्स आहेत स्वत:तच काही खास!
हेदेखील वाचा – शाओमीच्या वेबसाइटवर आला शाओमी Mi मॅक्स फॅबलेट, १० मे ला होणार लाँच