मोबाईल निर्माता कंपनी जिओनीने आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 लाइट अधिकृतरित्या भारतात लाँच केला आहे. भारतात ह्या स्मार्टफोनचे व्हर्जन सादर केले गेले आहे, त्यात 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवर १२,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे.
जिओनी मॅरेथॉन M5 लाइट स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याची बॅटरी. ह्या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची लिथियम पॉलीमर बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही ४० तासांचा टॉकटाइम आणि ६८ तासांचा म्यूजिक प्लेबॅक टाइम देईल. सर्वसाधारण वापरासाठी ह्यात ३ दिवस चालण्याचा आणि ३९ दिवसांचा स्टँडबाय वेळ देण्याचा दावा केला आहे. ह्या हँडसेटने दुस-या स्मार्टफोनसुद्धा चार्ज केले जाऊ शकते. कंपनीनुसार, स्मार्टफोनला बनविण्यासाठी एबियेशन ग्रेड अॅल्युमिनियम एलॉयचा वापर करण्यात आला आहे.
ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ग्राफिक्ससाठी माली-T720 GPU इंटिग्रेटेड आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश असलेला 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा अमिगो 3.0 वर चालेल जो अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय 4G स्मार्टफोन आहे.
ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ 4.0, GPS, वायफाय आणि मायक्रो-USB फीचर्स दिले आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 143x69x8.5mm आणि वजन 182 ग्रॅम आहे.