मोबाईल निर्माता कंपनी जिओनीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6020mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्स दरम्यान जिओनी मॅरेथॉन M5 चे प्रदर्शन केले होते.
मोठी बॅटरी असूनसुद्धा हा स्मार्टफोन जास्त मोठा नाही आहे, तर कंपनीने ह्याला स्लिम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोनची जाडी 8.5mm आहे. कंपनीने जिओनी मॅरेथॉन M5 ड्युल बॅटरी तंत्रज्ञानाने सुसज्ज केला आहे. ह्यात 3010mAh च्या दोन बॅटरी आहेत. ह्या दोन्ही बॅटरी खूप लवकरच चार्ज होतात. फोनमध्ये एक्ट्रीम मोड फीचर आहे, ज्याच्या माध्यमातून 5 टक्के चार्जिंगमध्येही आपला फोन ६२ तास चालू शकतो. तसेच ह्या फोनच्या माध्यमातून दुस-या फोनमध्येसुद्धा चार्ज करु शकता.
जर जियोनी मॅरेथॉन M5 स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, वायफाय आणि 4G LTE सपोर्ट आहे.
फ्लिपकार्टवर 17999 रुपयांत खरेदी करा जियोनी मॅरेथॉन M5