मोबाईल निर्माता कंपनी जिओनीने आपला नवीन स्मार्टफोन M5 लाइट भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा दावा फोनरेडोर वेबसाइटने केला आहे. तथापि, अजूनपर्यंत कंपनीनकडून ह्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनीने M5 लाइट स्मार्टफोनला डिसेंबर २०१५ मध्ये भारतात लाँच केले होते.
फोनरेडोर वेबसाइट अनुसार जिओनी M5 लाइट भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये आहे, मात्र फोनवर ह्याची MRP १३,९०९ दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्या स्मार्टफोनमध्ये दोन बॅटरी दिल्या गेल्या आहेत. स्मार्टफोनमध्ये 4000mAh क्षमतेच्या लिथियम-पॉलीमर बॅटरीचा वापर केला गेला आहे आणि ह्याची किंमत १०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. कंपनीनुसार, जर ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, ही ४० तासांचा टॉकटाईम आणि ६८ तासांचा म्यूजिक प्लेबॅक टाइम देण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला एका पॉवर बँकप्रमाणे वापरु शकतो. ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण आपल्या कोणत्याही मित्राचा स्मार्टफोनही चार्ज करु शकता.
जिओनी मॅरेथॉन M5 लाइट स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. स्मार्टफोनमध्ये 1.3GHz चा 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसर दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये १जीबीची रॅमसुद्धा दिली गेली आहे.
हा स्मार्टफोन Amigo 3.0 वर काम करतो, जो अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे. स्मार्टफोन 4G ला सपोर्ट करतो. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमद्ये LED फ्लॅशसह ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात ब्लूटुथ 4.0, GPS, वायफाय आणि मायक्रो-USB इत्यादी फीचर्स दिले गेले आहेत.