जिओनी F103 स्मार्टफोन लाँच, कंपनीचा पहिला मेड इन इंडिया फोन
ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. स्मार्टफोनची स्क्रीन असाही ड्रॅगनट्रेल कोटिंग आहे,जी ह्यावर ओरखडे होण्यापासून वाचवते. स्मार्टफोनमध्ये १.३GHz चा क्वाडकोर प्रोसेसरसुद्दा आहे.
मोबाईल निर्माता कंपनी जिओनीने भारतात बनलेला आपला पहिला स्मार्टफोन F103 लाँच केला आहे, ह्या स्मार्टफोनला कंपनीने मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनवले आहे. एफ कंपनीची नवीन लाइफ स्टाइल सीरिज आहे आणि ह्या सीरिजमध्ये F103 पहिला फोन आहे.
जिओनीच्या पहिल्या मेड इन इंडिया फोनच्या लाँचवेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि जिओनी इंडियाचे सीईओ व एमडी अरविंद वोहरा शिवाय जिओनीचे अध्यक्ष विल्यम लूसुद्धा उपस्थित होते.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला जिओनीने अशी घोषणा केली आहे की, ते लवकरात लवकर भारतात उत्पादन सुरु करणार आहे. F103 मॉडेल जिओनीचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्याची निर्मिती फॉक्सकॉनद्वारा केली गेली आहे. कंपनीने ह्यासाठी आंध्रप्रदेश च्या वायजॅकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटची स्थापना केली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. स्मार्टफोनची स्क्रीन असाही ड्रॅगनट्रेल कोटिंग आहे,जी ह्यावर ओरखडे होण्यापासून वाचवते. स्मार्टफोनमध्ये १.३GHz चा क्वाडकोर प्रोसेसरसुद्दा आहे. स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ५.० लॉलीपॉप आधारित आहे. ह्या फोनमध्ये अमिगो ३.० यूजर इंटरफेस पाहायला मिळेल.
ह्याप्रसंगी कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी ह्या वर्षी आतापर्यंत ७ मिलियनपेक्षाही जास्त हँडसेट विकले आहेत आणि भारतात उत्पादन करुन २०१५-२०१६ पर्यंत वाढवून ते दुप्पच करण्याची कंपनीची योजना आहे.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile