Gionee ने भारतात लॉन्च केले F205 आणि Gionee S11 Lite स्मार्टफोन

Updated on 26-Apr-2018
HIGHLIGHTS

Gionee F205 ची किंमत 8,999 रूपये आणि Gionee S11 Lite ची किंमत 13,999 रूपये आहे.

Gionee ने आज भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स F205 आणि S11 Lite लॉन्च केले आहेत. या डिवाइस ची खासियत यांचे फुल व्यू डिस्प्ले, फेस अनलॉक फीचर, बोकेह इफेक्ट आणि अॅप क्लोन फीचर्स आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स एंड्राइड 7.1.1 नौगट वर चालतात जो कस्टम OS वर आधारित आहे. 

Gionee F205 रोज, गोल्ड, ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएन्ट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि याची किंमत 8,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन 26 एप्रिल पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन सेल साठी उपलब्ध होईल. तसेच Gionee S11 Lite ची किंमत 13,999 रूपये आहे. हा डिवाइस ब्लॅक, गोल्ड, डार्क ब्लू पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि पुढील महिन्यापासून या डिवाइस ची शिपिंग सुरू होईल. 
Gionee F205 स्मार्टफोन Amigo 5.0.11F वर चालतो जो एंड्राइड 7.1.1 वर आधारित आहे. या स्मार्टफोन मध्ये 5.45 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि या डिवाइस मध्ये मीडियाटेक MT6739 SoC आणि 2GB रॅम आहे. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे झाले तर Gionee F205 मध्ये 8 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे जो LED फ्लॅश सह येतो आणि सेल्फी साठी डिवाइस मध्ये 5 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे. या हँडसेट मध्ये 16GB इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. 
कनेक्टिविटी साठी हा फोन 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2, Wi-Fi, GPS, माइक्रो USB, आणि 3.5mm जॅक ला सपोर्ट करतो आणि या डिवाइस मध्ये 2670mAh ची बॅटरी आहे. या डिवाइस चे मेजरमेंट 148.40×70.7×7.95mm और) आणि वजन 135.6 ग्राम आहे. 

त्याचबरोबर, Gionee S11 Lite पाहता हा डिवाइस एंड्राइड 7.1.1 वर आधारित Amigo OS 5.0.13S वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 5.7 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 435 SoC आणि 3GB रॅम आहे. कॅमेरा डिपार्टमेंट पाहिला तर Gionee S11 Lite मध्ये 13 आणि 2 मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा आहे आणि डिवाइस च्या फ्रंट वर 16 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे जो बोकेह इफेक्ट सह येतो. या स्मार्टफोन मध्ये 32GB इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते.
Gionee S11 Lite कनेक्टिविटी साठी 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2, Wi-Fi, GPS, आणि 3.5mm हेडफोन जॅक ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये 3030mAh ची बॅटरी आहे आणि याचे मेजरमेंट 153.75x 72.6×7.85mm तर वजन 141 ग्राम आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :