मोबाईल निर्माता कंपनी जिओनी आपला नवीन स्मार्टफोन ईलाइफ S8 ला २२ फेब्रुवारीला लाँच करेल. जिओनीने आपल्या ह्या स्मार्टफोनला लाँच करण्यासाठी MWC 2016 ट्रेड शो दरम्यान एका कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करत आहे.
कंपनीद्वारा दिल्या गेलेल्या माहितीनुसार, जिओनी इलाइफ S8 स्मार्टफोनची कामगिरी खूप चांगली असेल. हा स्मार्टफोन जलद गतीने फोटो काढण्याच्या खास वैशिष्ट्यासह सादर केला आहे. ह्यात प्रेशर-सेंसेटिव डिस्प्लेसुद्धा असेल. हा फीचर आयफोन 6S, आयफोन 6S प्लस आणि हुआवे मॅट S स्मार्टफोनमध्ये आहे.
जिओनीने अशीही माहिती दिली आहे की, “मोबाईल फोटोग्राफीचे नवीन युग आले आहे. आम्ही आमच्या यूजरचे ह्या नवीन प्रवासात स्वागत करतो. आमचे असे मत आहे की, तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. MWC 2016 मध्ये जिओनी आपल्या S सीरिजचा नवीन सदस्य E-लाइफ S8 सुद्धा सादर करेल. नवीन स्मार्टफोन आकर्षक फोटो शूटिंग फीचर आणि प्रेशर सेंसेटिव डिस्प्लेसह येईल.”
कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या आधी बाजारात आपला स्मार्टफोन जिओनी इलाइफ S7 सादर केला होता. कंपनीने ह्या स्मार्टफोनलासुद्धा २०१५ च्या MWC मध्ये सादर केले होते. हा स्मार्टफोन खूप बारीक आहे. ह्या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे 5.5mm ची पातळ बॉडी. भारतात एप्रिल २०१५ मध्ये २४,९९९ रुपयात हा सादर केला गेला होता.
हेदेखील वाचा- कॅमेरा सेंट्रिक ओप्पो F1 स्मार्टफोन झाला भारतात लाँच
हेदेखील वाचा- आयबेरी ऑक्सस स्टनर स्मार्टफोन लाँच