मोबाईल निर्माता कंपनी जिओनी १६ नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन ईलाइफ S6 सादर केला जाणार आहे. खरे पाहता, कंपनीने जिओनी ईलाइफ S6 संबंधी काही नवीन माहिती दिली आहे.
कंपनीने जे फोटोज सादर केले आहेत, त्यात जिओनी ईलाइफ S6 स्मार्टफोन दिसत आहे. फोटोंना पाहिल्यावर असे समजते की, ह्या फोनची बॉडी धातूची बनवली आहे आणि हा आयफोनसारखा सोनेरी प्रकारात आहे.
हा तोच स्मार्टफोन आहे, ज्याला अलीकडेच सर्टिफिकेशन वेबसाइट टीनावर मॉ़डेल GN9010 च्या नावाने लिस्ट केले गेले.
ह्याआधीही ह्या स्मार्टफोनसंबंधी सर्व माहिती समोर आली आहे. हल्लीच समोर आलेल्या लीक्सनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल असू शकते. त्याचबरोबर ह्यात 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम असण्याची शक्यता आहे.
ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज असू शकते. अशी आशा आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो.