अप्रतिम ऑफर ! अगदी फुकटात मिळतोय iPhone 12, एक रुपयासुद्धा देण्याची गरज नाही
iPhone 12 अगदी फुकटात तुमचा होईल
Verizon ने iPhone 12 मोफत मिळवणे शक्य
जाणून घ्या, Verizon वर iPhone 12 डील
iPhones सर्वात प्रीमियम आणि महाग फोनच्या श्रेणीमध्ये मोडतात. पण आता एक ऑफर आली आहे, ज्यातून iPhone 12 अगदी मोफत मिळण्याची शक्यता आहे. Verizon ने iPhone 12 मोफत मिळवणे खरोखरच शक्य केले आहे. हा iPhone दोन वर्षांपूर्वी 64GB च्या बेस मॉडेलसाठी $699 म्हणजेच रु. 55,840 च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. पण व्हेरिझॉनच्या डीलमुळे फोन फ्री झाला आहे. हा iPhone मिळवण्यासाठी कोणत्याही मागणीच्या ट्रेड-इनमधून जाण्याची गरज नाही. iPhone 12 चा मोफत लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त Verizon वरून एक नवीन लाइन खरेदी करायची आहे.
हे सुद्धा वाचा : Truecaller Features : 'हे' आकर्षक फीचर्स तुमच्यासाठी महत्त्वाचे, वाचा सविस्तर
iPhone 12 A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे, कॅमेरा परफॉर्मन्स उत्तम आहे. याला iOS 16 वर्जनचे लेटेस्ट अपग्रेड देखील मिळेल, जे 7 सप्टेंबर रोजी रिलीज होण्याची अपेक्षा आहे. हे iPhone 12 ला उत्कृष्ट बनवते. तथापि, फोन तुमचा होण्यापूर्वी तुम्हाला या विशिष्ट अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागेल.
Verizon वर iPhone 12 डील
स्टेप 1: Verizon वेबसाइटवर जा आणि iPhone 12 शोधा.
स्टेप 2: तुमच्या आवडीनुसार iPhone 12 साठी मेमरी आणि कलर पर्याय निवडा.
स्टेप 3: नवीन लाइन पर्याय जोडा 'गेट इट फ्री विद सिलेक्ट 5G अनलिमिटेड प्लान्स. न्यू लाइन रिक्वायर्ड' वर टॅप करा.
स्टेप 4: सुरू ठेवा वर क्लिक करा आणि पुढील विंडोमध्ये 'न्यू युजर' पर्याय निवडा.
स्टेप 5: त्यानंतर, नवीन स्क्रीन उघडेल जिथे तुम्हाला तुमचा पिन कोड प्रविष्ट करावा लागेल आणि स्थानाची पुष्टी करावी लागेल.
स्टेप 6: आता येथे तुम्हाला अनेक Verizon प्लॅन्स मिळतील. तुम्हाला पटेल तो प्लॅन निवडा आणि iPhone 12 मोफत मिळवण्यासाठी 36 महिन्यांच्या कालावधीसाठी देय देण्यासाठी पुढे जा.
स्टेप 7: पेमेंट पूर्ण झाल्यावर, त्या कालावधीसाठी Verizon सदस्यत्व प्लॅनसह iPhone 12 तुमचा असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile