HMD ग्लोबल लवकरच आपला Nokia X स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, डिवाइस च्या लॉन्च आधीच डिवाइस. बद्दल जवळपास सर्व माहिती समोर आली आहे. आता गीकबेंच वर पण हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 636 सह दिसला आहे.
गीकबेंच वर मिळाला हा स्कोर
हा आगामी मिड-रेंज स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे, या डिवाइस मध्ये एंड्राइड 8.1 ओरियो, 6GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 636 ओक्टा कोर प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 1.61GHz आहे. Nokia X6 ला सिंगल कोर टेस्ट मध्ये 1332 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 4892 पॉइंट्स मिळाले आहेत. हा स्कोर इतर फोन्स इतकाच आहे जे स्नॅपड्रॅगन 636 वर चालतात.
स्पेसिफिकेशन्स
Nokia X6 स्मार्टफोन मध्ये 5.8 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल आणि याच्या टॉपला एक नॉच असेल. डिवाइस दोन वेरिएन्ट्स 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज तसेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मध्ये लॉन्च केला जाईल. डिवाइस मध्ये 3,000mAh ची बॅटरी, रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्यूल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर सेल्फी साठी या डिवाइस मध्ये 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.
हँड्स-ऑन विडियो मधून मिळालेली माहिती
काही दिवसांपूर्वी कंपनी ने चीन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये Nokia X स्मार्टफोन दाखवला होता. इवेंट मधून एक हँड्स ऑन विडियो समोर आला होता ज्यातून स्मार्टफोन च्या डिजाइन बद्दल माहिती मिळाली आहे. डिवाइस मध्ये 19:9 एस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे ज्याच्या टॉप ला नॉच आहे आणि डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या फ्रंटला असलेले साइड बेजल्स स्लिम आहेत आणि डिवाइस ची बॅक ग्लास ने बनली आहे.
नॉच डिजाइन मध्ये असतील हे सेंसर्स
आधी आलेल्या लीक्स नुसार डिवाइस च्या नॉच डिजाइन मध्ये इयरपीस, फ्रंट कॅमेरा आणि प्रॉक्सिमिटी सेंसर असतील. फोन च्या रियर पॅनल वर वर्टिकल ड्यूल कॅमेरा सेटअप असेल आणि डिवाइस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर असेल. डिवाइस च्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन बटन असेल आणि बॉटमला चार्जिंग पोर्टला जागा देण्यात आली आहे.