Affordable Gaming smartphones: गेमिंग लव्हर्ससाठी लोकप्रिय टॉप 5 स्मार्टफोन्सची यादी, Realme, Motorola चे फोन्स उपलब्ध। Tech News

Updated on 21-Nov-2023
HIGHLIGHTS

20,000 रुपयांच्या आत गेमिंगसाठी अप्रतिम स्मार्टफोन्सची यादी

BGMI, फ्री फायर इ. गेम्स भारतात लोकप्रिय झाले आहेत.

Redmi 12 5G डिवाइस Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वर चालतो.

बऱ्याच कालावधीपासून तरुणाईमध्ये गेमिंगचा छंद वाढतच चालला आहे. एवढेच नाही, तर गेमिंगमधून अनेकांनी पैसे कमावण्यास देखील सुरुवात केली आहे. BGMI, फ्री फायर इ. गेम्स भारतात लोकप्रिय झाले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही अशा काही स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे, जे 20,000 रुपयांच्या आत Gaming साठी खूप चांगले आहेत. जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy Buds 3 Pro ची भारतात होणार दाखल, Galaxy Z सीरिजच्या फोनसह लवकरच होतील Launch

Realme 11 5G

Realme 11 5G मध्ये 6.72-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोन नवीनतम MediaTek Dimensity 6100+ SoC सह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा आहे. यामध्ये सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेट 5000mAh बॅटरीसह येतो, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Moto G54 5G

Moto G54 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले समाविष्ट आहे. Motorola चा हा 5G फोन MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरवर चालतो. हँडसेटमध्ये 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरी देतो आणि 33W चार्जिंगला सपोर्ट करतो.

Redmi 12 5G

Redmi 12 5G फोन 6.79-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेसह येतो जो 90Hz रिफ्रेश ऑफर करतो. हा डिवाइस Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वर चालतो. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP सेकंडरी कॅमेरा आणि समोर 8MP सेल्फी शूटर आहे. तसेच, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते.

Infinix Note 30 5G

Infinix च्या या फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6080 चिपसेट सह येतो. फोटोग्राफीसाठी डिव्हाइसमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ युनिट, एक AI लेन्स आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी समाविष्ट आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :