LPDDR5 RAM सह येऊ शकतो Galaxy S10
2018 मध्ये लॉन्च केलेली आपली LPDDR5 मेमरी चिप सॅमसंग आता आपल्या आगामी लेटेस्ट स्मार्टफोन Galaxy S10 मध्ये वापरू शकते. लीक रिपोर्ट्स नुसार कंपनी या नवीन टेक्नोलॉजीचा वापर आपल्या येऊ घातलेल्या Galaxy S10 सीरीजच्या डिवाइस मध्ये करू शकते.
महत्वाचे मुद्दे:
- 20 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो Galaxy S10
- फोल्डेबल स्मार्टफोन असू शकतो लॉन्चचा भाग
- LPDDR4X चिप्स पेक्षा 30% जास्त किफायती आहे हि चिप
2018 मध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने जगातील पहिली LPDDR5 मेमरी चिप्स सादर केली होती आणि आता असे बोलले जात आहे कि कंपनी आपल्या आगामी नेक्स्ट-जनरेशनच्या स्मार्टफोन्स मध्ये या चिपचा वापर करू शकते. रिपोर्ट्स नुसार आपल्या पुढील लॉन्च इवेंट मध्ये कंपनी आपल्या Galaxy S10 सीरीज मध्ये S10 Lite आणि S10+ चा पण समावेश करून त्यात या चिपचा वापर करु शकते.
ट्विटर वर एका टिपस्टरच्या रिपोर्ट नुसार Galaxy S10 फोन्स 20 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतात. त्याचबरोबर बोलले जात आहे कि LPDDR5 चिप्स LPDDR4X चिप्सच्या तुलनेत जास्त पावर-एफिशियंट आहेत. तसेच हि नवीन टेक्नोलॉजी 1.5 पट जास्त 6,400Mbps डेटा ट्रांसफर स्पीड देते. सॅमसंग म्हणते कि या हाय बँडविड्थ चिप्स AI-पॉवर्ड ऍप्स आणि सोबतच 5G फोन्सना पण सपोर्ट करतील. त्यामुळे आपण असे बोलू शकतो कि फक्त 5G-इनेबल्ड Galaxy S10 लाच या नवीन मेमरीचा फायदा मिळू शकतो पण अशा अशीच आहे कि सॅमसंग आपल्या सर्व अपकमिंग फोन्स मध्ये या चिपचा वापर करेल.
Galaxy S10 फोन्स बद्दल बोलायचे तर आतापर्यंत आलेल्या लीक रिपोर्ट्स आणि रूमर्स नुसार फ्लॅगशिप फोनचा "Lite" वर्जन 5.8-inch Infinity-O डिस्प्ले सह दिसू शकतो. सोबत Infinity-O डिस्प्ले सह सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले होल पण देण्यात आला आहे. तसेच यात नॉच नसेल.
तर Galaxy S10 मध्ये मोठा कर्व Infinity-O डिस्प्ले असू शकतो. Galaxy S10 मध्ये 6.1-इंचाच्या डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी सिंगल होल दिला जाऊ शकतो. प्लस साईझ मॉडेल मध्ये तुम्हाला 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. सोबत ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासाठी कट-आउट्स सह हा डिवाइस येऊ शकतो.