Galaxy Note 9 च्या एक्सिनोस वेरिएंट ला स्नॅपड्रॅगन वेरिएंट पेक्षा गीकबेंच वर मिळाला जास्त स्कोर

Updated on 28-May-2018
HIGHLIGHTS

एक्सिनोस 9810 वेरिएंट ला गीकबेंच च्या सिंगल कोर टेस्ट मध्ये 2737 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 9064 स्कोर मिळाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला Samsung चा आगामी डिवाइस Galaxy Note 9 बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता. पण आता पर्यंत या डिवाइस चा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 वर्जन दिसला होता. पण नवीन लीक वरून डिवाइस च्या एक्सिनोस 9810 CPU वेरिएंट च्या गीकबेंच रिजल्ट चा खुलासा झाला आहे. Galaxy Note 9 मॉडेल नंबर SM-N960N सह दिसला आहे आणि या डिवाइस मध्ये एक्सिनोस 9810 ओक्टा-कोर चिपसेट आणि 6GB रॅम आहे. CPU 1.79GHz वर क्लोक्ड आहे आणि स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित आहे. 

गॅलेक्सी डिवाइस बद्दल बोलायचे तर एक्सिनोस वर आधिरत डिवाइस स्नॅपड्रॅगन आधिरत डिवाइस च्या तुलनेत चांगली परफॉरमेंस देतात. रिपोर्ट नुसार एक्सिनोस वेरिएन्ट्स Samsung च्या UI वर चालतात आणि स्नॅपड्रॅगन च्या तुलनेत जास्त स्मूथ असतात 
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 वेरिएंट ने गीकबेंच वर सिंगल कोर टेस्ट मध्ये 2190 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 8806 स्कोर मिळवला होता. तर, एक्सिनोस 9810 वेरिएंट ला गीकबेंच च्या सिंगल कोर टेस्ट मध्ये 2737 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 9064 स्कोर मिळाला आहे. अंदाज लावला जात आहे की Galaxy Note 9 मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले असेल आणि हा एक सुपर AMOLED पॅनल असण्याची शक्यता आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18.5:9 असेल. 

आशा पण रुमर्स येत आहेत की Galaxy Note 9 मध्ये 12MP चा डुअल रियर कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्स वरून हे पण संकेत मिळतात की Galaxy Note 9 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल आणि डिवाइस मध्ये Samsung च्या स्मार्ट असिस्टेंट Bixby चे नवीन वर्जन पण असू शकते. Galaxy Note 9 चे बेंचमार्क लीक्स आल्यानंतर आशा केली जात आहे की कंपनी लवकरच हा डिवाइस लॉन्च करेल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :