Amazon Prime Day Sale अवघ्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. हा सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये iQOO Z6 5G, iQOO Neo 6 5G आणि iQOO Z6 Pro इ. अनेक उत्कृष्ट iQOO स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती उपलब्ध असतील. रिपोर्टनुसार, नवीन लाँच केलेला iQOO Neo 6 5G सेलमध्ये 29,999 रुपयांना उपलब्ध असेल. याशिवाय iQOO Z6 Pro 23,999 रुपयांना, तर iQOO Z6 5G 14,999 रुपयांना विकला जाईल. या सवलती व्यतिरिक्त, सेलमध्ये निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर त्वरित सवलत आणि कूपन बेनिफिट देखील मिळणार आहेत. ग्राहकांना त्यांचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंजवर अतिरिक्त सवलती देखील मिळणार आहेत.
iQOO Z6 5G चा 6GB+128GB व्हेरिएंट 16,999 रुपयांना आणि iQOO Z6 Pro 5G चा 6GB+128GB व्हेरिएंट 23,999 रुपयांना विकत आहे. याशिवाय ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास 3,000 रुपयांची झटपट सूट मिळणार आहे. iQOO NEO 6 5G 29,999 रुपयांना विकला जाईल. याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदीवर 11,950 रुपयांची सूट मिळेल.
याशिवाय, ई-कॉमर्स जायंट Redmi 9 सीरीज, Redmi Note 10T 5G, Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy s21 FE आणि Samsung Galaxy M52 5G इत्यादी स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. हा Amazon प्राइम डे सेल 24 जुलैपर्यंत फोन दिवसांसाठी असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.