आताच आलेल्या नवीन रिपोर्टनुसार, फ्रीडम 251 स्मार्टफोन ३० जूनपासून ५ जुलैपर्यंत एका लकी ड्रॉद्वारा विकला जाईल. त्याचबरोबर ह्याचे आतापर्यंत जवळपास ७० मिलियन रजिस्ट्रेशन झाले आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना ह्या स्मार्टफोन्सचे सर्वात जास्त रजिस्ट्रेशन उत्तर प्रदेशातून मिळाले जे जवळपास २.५ करोड आहे. मात्र कंपनी येथे केवळ १० हजार यूनिट्स लकी ड्रॉद्वारा दिला जाईल. त्याशिवाय इतर राज्यांतही हा लकी ड्रॉ होणार आहे.
ह्याआधी आलेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की, हा स्मार्टफोन ३० जूनपासून विकला जाईल. कंपनीचे CEO मोहित गोयल यांनी सांगितले आहे की, ह्या स्मार्टफोनचे २ लाख यूनिट डिलिवर करणार आहे. तसेच हा स्मार्टफोन मेक इन इंडियाच्या उपक्रमासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल, असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा – उत्कृष्ट मेटल बॉडीसह येणारे हे आकर्षक स्मार्टफोन्स आता भारतातही झाले उपलब्ध…
त्याशिवाय कंपनी आपला एक ३२ इंचाचा HD LED टीव्ही सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले जाऊ शकते. ह्या टीव्हीची किंमत १०,००० पेक्षाही कमी असू शकते.
हेदेखील वाचा – LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये
हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?