वेबसाइटवरील जास्त ट्रॅफिकमुळे फ्रीडम २५१ बुकिंग काही काळासाठी बंद

Updated on 19-Feb-2016
HIGHLIGHTS

ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 मेगापिक्सेलचा रियर आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर काम करतो.

मोबाईल निर्माता कंपनी रिंगिंग बेल्सने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन फ्रिडम 251 अधिकृतरित्या लाँच केला. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत केवळ 251 रुपये ठेवली आहे आणि हा कंपनीच्या वेबसाइटवरुन बुक केला जाऊ शकतो. तथापि, ह्या वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक झाल्यामुळे ह्याची बुकिंग तात्पुरता बंद केली आहे.

कंपनीचा दावा आहे की, खूप जास्त ओव्हरलोड झाल्यामुळे हा सर्वर ठप्प झाला आहे. जेव्हा तुम्ही फ्रीडम 251 च्या वेबसाइटवर जाऊन Buy Now वर क्लिक करता, तेव्हा तुम्हाला एक एरर पेज दिसतो. वेबसाइटवर रिंगिंग बेल्स टीमचा दावा आहे की, वेबपेजवर एका सेकंदात 6 लाख हिट्स झाल्यामुळे सर्वर ओवरलोड झाला आहे. ह्या कारणामुळे कंपनीने सध्यातरी ह्याची बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्विसला अपग्रेड केल्यानंतर २४ तासांत ही बुकिंग पुन्हा सुरु केली जाईल.

 

फोनच्या चिपला सध्यातरी तायवानमधून आयात केले जाईल. फोन पुर्णपणे भारतातच बनवला गेला आहे. कंपनीचे लक्ष्य ह्या वर्षाअखेरीस ह्या स्मार्टफोनचे हार्डवेअरला ७५ टक्के भारतात बनवण्याचे आहे. कंपनी प्रत्येक महिन्यात फ्रिडम 251 चे पाच लाख यूनिट बनवण्यासाठी प्रयत्न करेल. कंपनीचे लक्ष्य ह्या पायलट प्रोजेक्टमध्ये ५०० करोड रुपये लावण्याचा आहे.

स्मार्टफोनमध्ये ते सर्व मिळत आहे, जे आपल्याला ५०००  पासून ७००० पर्यंत येणा-या स्मार्टफोनमध्ये मिळते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर आणि 0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम, 8GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय ह्यात 1450mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर केवळ २५१ रुपयात आपल्याला 3G सपोर्ट करणारा एक ड्यूल सिम स्मार्टफोन मिळत आहे.

फोनमध्ये आधीपासूनच महिलांची सुरक्षा, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, गुगल प्ले, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि युट्यूब सारखे अनेक अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलेले असतील. रिंगिंग बेल्सनुसार, फ्रिडम 251सह १ वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळेल. ग्राहकांच्या मदतीसाठी देशभरात कंपनीचे 650 पेक्षा जास्त सर्विस सेंटर आहेत.

ह्या स्मार्टफोनची बुकिंग सुरु झाली असून ती २१ फेब्रुवारीपर्यंत चालू राहिल. मात्र जगातील सर्वात स्वस्त अशा ह्या स्मार्टफोनला मिळवण्यासाठी आपल्याला 30 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल.

हेदेखील वाचा – मिजू M2 नोट विरुद्ध लेनोवो K3 नोट

हेदेखील पाहा – बाजारात आलेले 5 नवीन स्मार्टफोन्स

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :