Important Tips: तुमचा विद्यमान फोन विकण्याआधी ‘ही’ महत्त्वाची कामे करून घ्या, अन्यथा…। Tech News

Updated on 06-Dec-2023
HIGHLIGHTS

फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

फोनमधील कॉल आणि वैयक्तिक मॅसेजेस जरूर डिलीट करा.

डेटाच्या बॅकअपसाठी Google Photos, Google Drive, Microsoft OneDrive, DropBox इ. चा वापर करता येईल.

सध्या बाजारात दररोज नवनवीन फोन लाँच होतात, ज्यामध्ये नवे आणि महत्त्वाचे फीचर्स ऑफर केले जातात. या कारणामुळे युजर्स आता 1-2 वर्षातच त्यांचे फोन बदलू लागले आहेत. त्याबरोबरच, जुने स्मार्टफोन विकणे आता खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे फोन ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करू शकता किंवा एक्सचेंज देखील करता येईल. पण फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या Tips लक्षात ठेवाव्या लागतील. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल किंवा तुम्ही फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता.

हे सुद्धा वाचा: OnePlus Nord 3 5G फोन Amazon वर अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळवा 2000 रुपयांचा Discount। Tech News

कॉल आणि मॅसेज

एखाद्याला फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमचे कॉल आणि मॅसेज हिस्ट्री निश्चितपणे रिमूव्ह करा. हे खूप महत्त्वाचे तुम्ही तुम्ही तुमचे मॅसेजेस काळजीपूर्वक तपासून डिलीट केले पाहिजेत. मेसेजमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे मॅसेजेसही असू शकतात, ज्यामध्ये तुमची फायनॅन्शियल किंवा पर्सनल माहिती असेल.

UPI ऍप्स डिलीट करा.

फोन विकण्यापूर्वी, तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व प्रकारचे UPI आणि पेमेंट Apps डिलीट करा आणि त्याचा डेटा देखील रिमूव्ह करा.

सिम कार्ड आणि मेमोरी कार्ड

तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर सिम कार्ड फोनमधून काढून घ्या. किंवा जर तुम्ही eSIM वापरत असाल तर eSIM चे प्रोफाइल नक्कीच हटवा. फोनच्या सेटिंग्जमधून ते तुम्हाला डिलीट करता येईल. जर तुम्ही मेमोरी कार्ड वापरत असाल तर ते देखील काढून घ्या.

डेटा बॅकअप आणि WhatsApp बॅकअप

फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यापूर्वी त्यात असलेल्या डेटाचा बॅकअप घ्या. बॅकअपसाठी Google Photos, Google Drive, Microsoft OneDrive, DropBox किंवा इतर कोणतीही क्लाउड सर्व्हिसेसचा वापर करा.

त्याबरोबरच, तुमचा जुना फोन विकण्याआधी WhatsApp चा बॅकअप नक्की घ्या. कारण सर्व प्रकारच्या वैयक्तिक गोष्टी आणि चॅटिंग यामध्ये असतात. बॅकअपमुळे जेव्हा तुम्ही नवीन फोनमध्ये WhatsApp इन्स्टॉल कराल तेव्हा तुमच्या चॅट्स तिथे रिस्टोअर होतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :