आज आहे फ्लिपकार्ट ‘बिग शॉपिंग डेज सेल’ चा शेवटचा दिवस

Updated on 09-Mar-2016
HIGHLIGHTS

SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ग्राहक ह्या सेलमध्ये ५,९९९ रुपयांपासून जास्त व्यवहार केल्यास १० टक्के डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात.

ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिकार्टवर सोमवारपासून बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला होता, बिग शॉपिंग डेज सेल वेबसाइट आणि मोबाईल अॅप दोन्ही माध्यमांतून उपलब्ध करण्यात आला आहे. ह्या सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

 

फ्लिपकार्टच्या ह्या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि टॅबलेट वर खास डिस्काइंट उपलब्ध आहे. त्याशिवाय एक्सचेंज ऑफरसुद्धा दिली जात आहे. त्याचबरोबर SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ग्राहक  ह्या सेलमध्ये ५,९९९ रुपयांपासून जास्त व्यवहार केल्यास १० टक्के डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात.

हेदेखील पाहा – (Marathi) Pebble Time Smartwatch Unboxing – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज सेलच्या अंतर्गत हुआवे नेक्सस 6P च्या 32GB आणि 64GB मॉडलवर ५००० आणि ३,५०० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. ज्यानंतर ह्याला ३४,९९९ आणि ३९,४९९ रुपयात खरेदी करु शकता. त्याचबरोबर ह्या फोनला २०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरमध्येसुद्धा खरेदी केले जाऊ शकते. ज्यानंतर ह्याची किंमत १४,९९९ रुपये आणि १९,४९९ रुपये होईल.

तसेच जर आयफोन 6S विषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16GB आणि 32GB च्या प्रकाराची किंमत २०००० रुपये आहे. एक्सचेंज ऑफरशिवाय 16GB च्या मॉडलची किंमत ४१,९९९ रुपये आहे, तर 32GB मॉडलची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन २०,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो. ह्या सेलच्या अंतर्गत आयफोन 6, मोटोरोला मोटो X स्टाइल, मोटोरोला मोटो X प्ले, शाओमी Mi 4 आणि शाओमी Mi पॅड वर सुद्धा उत्कृष्ट ऑफर्स मिळत आहे.

हेदेखील वाचा – इंटेक्स LED मॉनिटर 1901 लाँच: किंमत केवळ ६,००० रुपये

हेदेखील वाचा – तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून कसे रोखाल?

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :