2025 च्या पहिल्या Flipkart सेलची तारीख जाहीर! स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स इ. वर मिळेल भारी Discount
Flipkart ने देखील Flipkart Monumental Sale 2025 ची तारीख जाहीर केली.
Flipkart Monumental Sale 2025 येत्या आठवड्यात लाईव्ह होणार आहे.
नेहमीप्रमाणे Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधी लाईव्ह होईल.
Amazon प्रमाणे Flipkart ने देखील Flipkart Monumental Sale 2025 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्स Amazon आणि Flipkart प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारी निमित्त मोठ्या सेलचे आयोजन करतात. या सेलदरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट TV, लॅपटॉप्स, फर्निचर आणि कपड्यांवर मोठी सूट दिली जाणार आहे. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल येत्या सोमवारी लाईव्ह होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, प्राइम सदस्यांना बारा तासांपूर्वी म्हणजेच 12 जानेवारी 2025 पासून ऑफर्सचा लाभ घेता येईल. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टीव्ही, कपडे, खाद्यपदार्थ इत्यादींवर मोठी सूट दिली जाईल. तसेच, Flipkart Monumental Sale ची तारीख आणि इतर तपशील लाईव्ह करण्यात आले आहेत. पहा डिटेल्स-
Flipkart Monumental Sale 2025
Flipkart Monumental Sale 2025 सर्व युजर्ससाठी येत्या 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, नेहमीप्रमाणे Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधी म्हणजे 13 जानेवारी 2025 रोजी सुरू होणार आहे. ही सेल 2 ते 3 दिवसांपर्यंत लाईव्ह असेल.
Flipkart सेलमधील अपेक्षित सवलती
फ्लिपकार्टने त्यांच्या आगामी मोन्युमेंटल सेलच्या तारखेसह, या सेलसाठी त्यांची मायक्रो वेबसाइट लाईव्ह केली आहे. सेलदरम्यान, तुम्हाला निवडक बँक कार्डद्वारे पेमेंटवर सूट मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. तसेच, सेल दरम्यान दररोज रात्री 12 ते दुपारी 12 या वेळेत रश अवर्स दरम्यान आश्चर्यकारक ऑफर्स देखील मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, सेलदरम्यान दर तासाला नवीन टिक टॉक डील रिव्हिल केले जातील.
त्याबरोबरच, सेलदरम्यान स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तुम्ही पॉवर बँक किमान 50% सवलतीत आणि चार्जर 70% सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. मात्र, कंपनीने कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोनवर किती सूट मिळेल, हे अद्याप उघड केलेले नाही. येत्या काळात Flipkart उर्वरित डील जाहीर करेल, अशी माहिती मिळाली आहे. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट सेल पेजवर लक्ष ठेवावे लागेल. किचन आणि होम अप्लायन्सेसवरही बंपर सूट दिली जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile