Flipkart इलेक्ट्रॉनिक सेल आजपासून सुरु, ‘या’ जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सूट

Flipkart इलेक्ट्रॉनिक सेल आजपासून सुरु, ‘या’ जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सूट
HIGHLIGHTS

आजपासून फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक डे सेल सुरु.

24 मे पासून ते 29 मे पर्यंत या सेलचा लाभ घेता येईल.

महागड्या जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सूट.

फ्लिपकार्टवर 'फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स डे सेल' सुरू झाला आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 24 मे पासून 29 मे पर्यंत सुरु असणार आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत आहात तर या सेलचा तुम्हाला नक्की फायदा होईल.   

 फ्लिपकार्टवर  आजपासून फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स डे सेल सुरू झाला आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 24 मे पासून 29 मे पर्यंत असणार आहे. या सेलदरम्यान, स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर मग याबाबत थोडं सविस्तर जाणून घेऊयात… 

 फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स डे सेलमध्ये पुढील स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट:

Xiaomi 11i 5G वर सूट

 Xiaomi 11i 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. मात्र, 16% डिस्काउंटनंतर ते 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच एक्सचेंज ऑफर म्हणून, जुना किंवा आताचा फोन एक्सचेंज करून या स्मार्टफोनच्या खरेदीवर 23,250 रुपयांची बचत करता येईल. RBL बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून 10% पर्यंत सूट मिळू शकते. जर संपूर्ण एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल तर स्मार्टफोनची किंमत केवळ 1,749 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. 

Xiaomi 11i 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 108MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 5160 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Vivo T1 5G वर सूट

Vivo T1 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे. मात्र, 20% डिस्काउंटनंतर हा फोन 15,990 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच एक्सचेंज ऑफर म्हणून, या स्मार्टफोनच्या खरेदीवर जुना किंवा आताचा फोन एक्सचेंज करून 15,250 रुपयांपर्यंतची बचत करता येईल. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने 1,000 रुपयांची इन्स्टंट सूट मिळू शकते. तसेच, RBL बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून 10% सूट घेता येईल.

Redmi Note 10T 5G वर सूट

Redmi Note 10T 5G च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. मात्र, 20% डिस्काउंटनंतर हा फोन 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच एक्सचेंज ऑफर म्हणून, या स्मार्टफोनच्या खरेदीवर जुना किंवा आताचा फोन एक्सचेंज करून 11,250 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे 1,250 रुपयांची इंस्टंट सूट मिळेल. शिवाय, RBL बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून 10% सूट घेता येईल.

 

 
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo