digit zero1 awards

Flipkart Big Year End Sale उद्यापासून होणार सुरु, महागडी उपकरणे स्वस्तात मोठ्या Discount सह खरेदी करा 

Flipkart Big Year End Sale उद्यापासून होणार सुरु, महागडी उपकरणे स्वस्तात मोठ्या Discount सह खरेदी करा 
HIGHLIGHTS

Flipkart ने आपल्या Flipkart Big Year End Sale ची घोषणा केली आहे.

हा सेल उद्या 9 डिसेंबर पासून सुरु होणार असून 16 डिसेंबरपर्यंत चालेल.

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ऍक्सेसरीजवर 50% ते 80% पर्यंत सूट मिळणार आहे.

2023 या वर्षीचा आता अखेरचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु झाला आहे. हा वर्ष जाताना Flipkart ने Flipkart Big Year End Sale ची घोषणा केली आहे. या सेलदरम्यान महागडी उपकरणे स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. हा सेल उद्या 9 डिसेंबर पासून सुरु होणार असून 16 डिसेंबरपर्यंत चालेल. मात्र, फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल आजपासून सुरु झालेला आहे.

Flipkart सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ऍक्सेसरीजवर 50% ते 80% पर्यंत सूट मिळणार आहे. लॅपटॉप्स, स्पिकर्स, TV इ. उपकरणांर तुम्हाला मोठ्या सवलती मिळणार आहेत.

स्मार्टफोन्सवरील ऑफर्स

  • सेलमध्ये Google Pixel 7 सीरिज आणि Pixel 8 सिरीजवर चांगल्या ऑफर उपलब्ध असतील.
  • तुम्ही Samsung Galaxy S21 FE (2023) फोन 31,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
  • iPhone 14 तुम्ही 54,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. तर, तुम्ही थेट डिस्काउंट Samsung Galaxy S22 5G केवळ 37,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Flipkart Big Year End Sale deal on Samsung Galaxy S22 5G
  • तर तुम्ही Google Pixel 7 फोन फक्त 35,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि Vivo T2 Pro 5G डिस्काउंटसह केवळ 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

लॅपटॉप्सवरील ऑफर्स

  • सेलमध्ये तुम्ही Acer One14 Rs 36,990 मध्ये खरेदी करू शकता, जो इंटेल i5 प्रोसेसरसह येतो.
  • Lenovo IdeaPad Flex सेलदरम्यान 65,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
  • एवढेच नाही तर, तुम्ही बजेटमध्ये एखादा लॅपटॉप शोधत असाल तर तुम्ही HP 255 G9 840T7PA लॅपटॉप 19,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

TV वरील ऑफर्स

सेलदरम्यान प्रसिद्ध ब्रँड्सच्या TV वर अप्रतिम ऑफर्स आणि सवलती मिळणार आहेत. 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळणार आहेत. नवीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर, Thomson TV तुम्ही 5,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सेलमध्ये खरेदी करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo