मायक्रोमॅक्सचा केवळ सायनोजेन ब्रँड असलेल्या यू टेलिवेंचर्सने आपल्या नवीन अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनला लाँच करण्याच्या तारखेविषयी खुलासा केला आहे. कंपनीद्वारा पाठवल्या गेलेल्या निमंत्रणानुसार, ह्या नवीन फोनचे नाव यूनिकॉर्न ठेवण्यात आलय, जो की १९ मे ला लाँच केला जाईल. अलीकडेच ह्या स्मार्टफोनला गीकबेंच बेंचमार्क साइटवर पाहिले गेले होते. बेंचमार्क साइटची लिस्टिंगपासून हँडसेटचे अनेक स्पेसिफिकेशन आणि फीचरचा खुलासा झाला होता. स्मार्टफोनचे मॉडल नंबर YU5530 असू शकते.
यू टेलिवेंचर्सच्या राहुल शर्मांनी आधीच कन्फर्म केले होते की, त्यांचा पुढील स्मार्टफोन Cyanogen प्रोसेसरवर चालणार नाही.
गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार, हा डिवाइस 1.8GHz मिडियाटेक हेलियो P10 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याशिवाय ह्यात 4GB रॅम असेल. डिवाअस YU5530 ला बेंचमार्क टेस्टमध्ये सिंगल कोर टेस्टमध्ये 816 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 3059 स्कोर मिळाले. त्याशिवाय आम्ही ह्या डिवाइसला ह्याच फीचर्ससह GFX बेंचमध्ये पाहिले होते. GFX बेंचनुसार, हा स्मार्टफोन 1920x1080p रिझोल्युशनसह 5.4 इंचाची डिस्प्लेमध्ये येईल, ज्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज असेल.
हेदेखील वाचा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग
GFX बेंचमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे, ज्यात 4,000 पेक्षा जास्त व्हिडियो रेकॉर्ड केले जातील. त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा सुद्धा असेल.
यू टेलिवेंचर्सने अलीकडेच यू यूरेका नोट लाँच केला होता. ज्यात 1920x1080p रिझोल्युशनचा 6 इंचाचा पुर्ण HD डिस्प्ले आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज आणि 4000mAh ची बॅटरीसुद्धा आहे.
हेदेखील वाचा – भारतातही उपलब्ध झाले पेबल स्मार्टवॉच, किंमत ५,९९९ रुपये
हेदेखील वाचा – १३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन