MWC 2016 : गुगलचा पहिला मिड रेंज स्मार्टफोन ‘अॅनड्रॉईड वन’ लाँच

MWC 2016 : गुगलचा पहिला मिड रेंज स्मार्टफोन ‘अॅनड्रॉईड वन’ लाँच
HIGHLIGHTS

मार्चच्या शेवटपर्यंत अॅनड्रॉईड वन GM5 प्लस स्मार्टफोन तुर्कीमध्ये मिळणे सुरु होईल. तुर्कीनंतर १५ दुस-या देशांत हा फोन उपलब्ध होईल.

MWC 2016 मध्ये गुगलने आपला पहिला मिड रेंज स्मार्टफोन अॅनड्रॉईड वन GM5 प्लस लाँच केला आहे. कंपनीने नवीन अॅनड्रॉईड वन GM5 प्लस स्मार्टफोनची किंमत जवळपास २०,५०० रुपये (३०० डॉलर) ठेवली आहे.

 

मार्चच्या शेवटी अॅनड्रॉईड वन GM5 प्लस स्मार्टफोन तुर्कीमध्ये मिळणे सुरु होईल. तुर्कीनंतर १५ दुस-या देशांत हा फोन उपलब्ध होईल. सर्वात आधी लाँच झालेल्या अॅनड्रॉईड वन स्मार्टफोनची किंमत जवळपास ६,२९९ रुपये (91 डॉलर) होती. गुगलने मागील वर्षी जनपल मोबाइलसह मिळून युरोपमध्ये पहिला अॅनड्रॉईड वन स्मार्टफोन लाँच केला होता.

अॅनड्रॉईड वन GM5 प्लस स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD 2.5D डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 ने संरक्षित केली आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. रियर कॅमेरा ऑटोफोकस आणि ड्यूल फ्लॅशसह येतो. फ्रंट कॅमेरासुद्धा LED फ्लॅश आणि ऑटोफोकस फीचरसह येतो. हा स्मार्टफोन 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो.

फोनमध्ये रिवर्सिबल USB टाइप-C कनेक्टर आहे आणि हा क्वालकॉमच्या क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. जीएम 5 प्लसमध्ये मेटल बॉडी आहे आणि हा टेक्सचर बॅक कवरसह येतो. 300MBPS च्या डाउनलोड स्पीड आणि 100MBPS च्या अपलोड स्पीडसह स्मार्टफोन 4.5G (LTE-A) कॅट.7 ला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 3100mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

गुगलने अॅनड्रॉईड वन सीरिजला घेऊन जी रणनीति बनवली होती, ती बदलली आहे. गुगलने अॅनड्रॉईड वनची सुरुवात जून 2014 मध्ये केली होती. असे सांगितले जात होते की, अॅनड्रॉईड वनद्वारा गुगलचे लक्ष्य एशिया आणि आफ्रिकेसारखे बाजार होते. मात्र आता ह्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीकडे पाहून असे सांगितले जातय की, कंपनीने आपल्या रणनीतिमध्ये काही बदल केले आहेत.

हेदेखील पाहा – MWC 2016 मध्ये लाँच झालेल्या लेनोवो वाइब K5 प्लसची एक झलक

हेदेखील वाचा – MWC 2016 : अल्काटेल टू इन वन विंडोज टॅबलेट प्लस १० लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo