18:9 च्या ट्रेंडिंग डिस्प्ले सह Nokia च्या दोन नवीन फोन्सना मिळाले FCC सर्टिफिकेशन
सध्यातरी हे सांगता येत नाही की हे डिवाइस कधी आणि कोणत्या नावाने लॉन्च केले जातील.
HMD ग्लोबल ने Nokia 7 Plus मध्ये 18:9 चा ट्रेंडिंग डिस्प्ले दिला होता आणि आता कंपनी अजून एका डिवाइस मध्ये 18:9 एस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले देण्याची तयारी करत आहे. FCC वर TA-1057 आणि TA-1063 मॉडेल नंबर सह दोन Nokia फोन्स दिसले आहेत. बोलले जात आहे की डिवाइस मध्ये 18:9 डिस्प्ले असेल पण स्क्रीन ची साइज आणि टाइप चा खुलासा झाला नाही.
FCC डाक्यूमेंट्स नुसार, दोन्ही मॉडेल्स एकाच फोनचे सिंगल सिम आणि डुअल सिम वेरिएन्ट्स आहेत. यात NFC आणि 2,900mAh (~3000mAh) बॅटरी पण आहे. Nokia TA-1057 आणि Nokia TA-1063 स्नॅपड्रॅगन 600 सीरीज च्या कोणत्याही चिपसेट सोबत येऊ शकतात. पण सध्यातरी हे सांगता येत नाही की हे डिवाइस कधी आणि कोणत्या नावाने लॉन्च केले जातील.
HMD ग्लोबल 29 मे ला रशियात एक इवेंट आयोजित करत आहे जिथे हे डिवाइस लॉन्च केल्या जाण्याची शक्यता आहे. कंपनी यावर्षी Nokia 3 आणि Nokia 5 चे नवीन वर्जन पण लॉन्च करू शकते आणि सोबतच अशा अफवा येत आहेत की Nokia X5 आणि Nokia X7 वर पण कंपनी काम करत आहे.
कंपनी ने काही दिवसांपूर्वी Nokia X6 स्मार्टफोन लॉन्च केला होता ज्यात 5.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि ज्याचे रेजोल्यूशन 1080×2280 पिक्सल आहे. हा डिवाइस 2.5D कर्व ग्लास डिस्प्ले आणि गोरिला ग्लास 3 ने सुरक्षित पण करण्यात आला आहे.
हा कंपनी कडून पहिला असा डिवाइस आहे, जो iPhone X सारख्या नॉच डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये कंपनी ने एक ड्यूल कॅमेरा सेटअप पण दिला आहे, सोबतच या फोन मध्ये AI क्षमते व्यतिरिक्त HDR फीचर पण आहे. या डिवाइस ची सर्वात खास बाब याचे 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह लॉन्च होने. त्याचबरोबर फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे, या डिवाइस मध्ये 6GB च्या रॅम व्यतिरिक्त एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. फोन मध्ये क्विक चार्ज 3.0 सह एंड्राइड 8.1 Oreo चा सपोर्ट पण देण्यात आला आहे. तसेच गेमिंग साठी या फोन मध्ये डू नोट डिस्टर्ब मोड पण देण्यात आला आहे.