EXCLUSIVE: 2019 च्या Apple iPhone XI रेंडर्सची पहिली झलक

EXCLUSIVE: 2019 च्या Apple iPhone XI रेंडर्सची पहिली झलक
HIGHLIGHTS

2018 नंतर, ट्रिपल-कॅमेरा सेटअप Apple च्या iPhone ला पुन्हा बाजारात वर्चस्व गाजवण्यास मदत करू शकतो का?

2018 मध्ये ऍप्पलचे तीन स्मार्टफोन मॉडेल मध्ये केलेला योजनाबद्ध विस्तार जास्त लोकप्रिय झाला नाही कारण कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीती मध्ये डिसेंबर महिन्यात 12 टक्क्यांची घसरण झाली, पण क्यूपर्टिनो मधील या कंपनीचा इतिहास पुन्हा झेप घेण्याचा आहे. IPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR चे भविष्य काय असेल हे आता सांगणे कठीण आहे, पण आम्ही निश्चितपणे सांगू शकतो कि Apple 2019 मध्ये तीन नवीन iPhones लॉन्च करेल, जे वर्तमान लाइनअप पुढे चालू ठेवतील. आम्ही 2019 च्या आगामी iPhone साठी @Onleaks सोबत भागीदारी करून त्यांची माहिती मिळवली आहे. तसे पाहता हे आगामी फोनच्या लॉन्च पेक्षा खूप आधी होत आहे. पुढील फ्लॅगशिप iPhone मध्ये मागे तीन कॅमेरा असतील, असे समोर येत आहे.

लीक केले गेलेले रेंडर एका स्केअर कॅमेरा यूनिट हाउसिंगचा खुलासा करतात ज्यात एका रेषेत नसलेले तीन कॅमेरा आहेत. यात दोन कॅमेरा आहेत जे IPhone X च्या ड्यूल कॅमेरा सारखे देण्यात आले आहेत. रेंडर वरून समजते कि दोघाच्या मध्ये एक तीसरा कॅमेरा असेल, जो बाजूला असेल. वर एक एलईडी फ्लश आणि खालच्या बाजूला एक माइक्रोफोन आहे.

OnLeaks चा दावा आहे कि 2019 चे iPhones सध्या इंजीनियरिंग मान्यता चाचणी (EVT) च्या टप्प्यात आहेत आणि स्मार्टफोन मॉडेल मध्ये जेव्हा फोन सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च होईल तेव्हा त्यात बदल होण्याची शक्यता आहे. आम्हाला अशी पण माहिती मिळाली आहे कि Apple सप्टेंबर 2019 मध्ये तीन iPhones लॉन्च करण्याची योजना बनवत आहे – एक लो-एंड वेरिएंट, संभावित iPhone XR चा उत्तराधिकारी आणि दोन हाई-एंड वेरिएंट, iPhone XS आणि iPhone XS मॅक्स चे उत्तराधिकारी असतील. ज्या प्रकारचा फोटो देण्यात आला आहे त्यावरून यातील कोणत्या फोन मध्ये तीन कॅमेरा असतील हे सांगणे कठीण आहे. पण कॅमेरा सेटअप मधील हा एवढा मोठा बदल पाहून हा बदल 2019 iPhone च्या टॉप व्हेरिएंट मध्ये होऊ शकतो असे वाटते.

हे खरे आहे कि 2019 iPhones मध्ये तीन कॅमेरा असू शकतात, यासाठी ब्लूमबर्ग च्या एका रिपोर्टशी क्रॉस-रेफर करण्यात आले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि Apple 2019 iPhones मध्ये 3D ToF टेक्नॉलॉजी स्वीकारेल. मागे तीन कॅमेरा मॉड्यूल देताना Apple ओप्पो R17 प्रो सारख्या रियर कॅमेरा टेक्नॉलॉजी वापरू शकते. ToF म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट टेक्नोलॉजी एखादा 3D मॅप बनवण्यासाठी एखाद्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित होण्यास लागणाऱ्या वेळेवर अवलंबून असते. सध्या सोनी या टेक्नॉलॉजीसाठी 3डी सेंसरची निर्मिती करत आहे, आणि ब्लूमबर्गच्या रिपोर्ट मध्ये हे निश्चित करण्यासाठी सोनी कडून माहिती घेतली आहे. थोडक्यात काय तर लीक केले गेलेले रेंडरर्स वरील माहितीनुसार आहेत त्यामुळे ते योग्य वाटतात.

सोनीच्या सेंसर डिवीजनचे प्रमुख, सतोशी योशिहारा ने ब्लूमबर्गला सांगितले कि, "कॅमेऱ्याने फोन मध्ये क्रांतिकारी बदल आणले आहेत आणि ते मी पहिले आहेत, त्याचा आधारावर मला वाटते कि 3डी कॅमेरा पण असाच बदल आणतील." सोनी ने iPhone ची मागणी पूर्ण करण्यासाठी रियर आणि फ्रंट फेसिंग 3D ToF सेंसरचे उत्पादन सूर करण्याची योजना बनवली आहे. हे उत्पादन उन्हाळ्याच्या शेवटी सुरु होईल अशी अशा आहे.

तिसऱ्या कॅमेऱ्याचा वापर ऑब्जेक्ट वर वेगाने फोकस करण्यासाठी आणि 3डी मॉडेल बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हा ऑब्जेक्ट वर लेजर पल्स टाकून त्या परावर्तित होण्यास लागणार वेळ मोजून आंध्रात पण वस्तू ट्रॅक करू शकतो. एआर आणि वीआर वर या सेंसरचा मोठा प्रभाव पडू शकतो. सोनीचा दावा आहे कि टीओएफ सेंसरचा वापर रिअल टाईम मध्ये खोली मॅप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एका डेमो मध्ये, रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि सोनी ने कॅमेऱ्याचा वापर एखाद्या गेम मध्ये युजरचे हात ट्रॅक करण्यासाठी जसे कि जादू करणे इत्यादीसाठी केला जाऊ शकतो हे दाखवले.

2019 चे iPhones उपलब्ध होण्यास अजूनही नऊ महिन्यांचा काळ आहे. आणि तरीही आम्ही निश्चितपणे सांगू शकतो कि हे फ्लॅगशिप स्मार्टफोन फोटोग्राफी चांगली करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करतील. रेंडरर्स वरून समजले आहे कि हा फोन काळ्या रंगाच्या रियर पॅनल ग्लास पासून बनेल. पण Apple लोगो आकर्षणच्या केंद्रस्थानी असेल, जो वरच्या बाजूला मधेच आहे.

आधीच्या एका रिपोर्ट मध्ये असा पण दावा केला गेला होता कि Apple मध्ये मोठा डिजाईन बदल दिसणार नाही. टिपस्टर आइस यूनिवर्स ने एक ट्वीट मध्ये नोट केले होते कि Apple 2019 मध्ये नॉच चा वापर करेल आणि 2020 मध्ये कंपनी पंच-होल डिस्प्ले असलेले iPhones लॉन्च करण्याची शक्यता आहे.

पण तीन कॅमेरा असणे साहजिकच प्रभावशाली वाटते, यामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. आईफोन एक्सएस मॅक्स च्या एका teardown मध्ये, असे नोट केले गेले होते कि 256जीबी 2018 च्या फ्लॅगशिप आईफोनच्या मटेरियलचे बिल 443 डॉलर होते जो यूएस मध्ये 1243 डॉलरने विकला जातो. उच्च गुणवत्ता असलेले घटक वापरण्यासाठी प्रसिद्ध असलेली ऍप्पल याची पण किंमत वाढवू शकते. 2019 च्या आईफोनच्या किंमतीवर याचा किती परिणाम होतो ते बघावे लागेल .

2018 मध्ये कमी विक्री झाल्यामुळे Apple ने आगामी तिमाही रिपोर्ट साठी iPhone च्या विक्रीचे पूर्वानुमान कमी केले आहेत. कंपनी ने 2018 iPhones ची विक्री वाढवण्यासाठी कॉस्ट कटिंग आणि इन्सेन्टिव्ह आणले आहेत. अनेक तज्ञांच्या मते अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्धामुळे चीन मध्ये iPhone च्या विक्रीला नुकसान झाले आहे, तर भारतात आईफोनच्या वरचढ किंमतींमुळे जगातील दुसऱ्या मोठ्या स्मार्टफोन बाजरात खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे.

सेटअप मध्ये एक तिसरा कॅमेरा जोडून Apple काय करू इच्छिते हे आता बघावे लागेल, कंपनी पुन्हा आपले स्थान मिळवेल का तेही बघावे लागेल. कंपनी ने भूतकाळात अनेकदा असे केले आहे. आणि लीक वरून समजते कि एक ट्रिपल-कॅमेरा iPhone कंपनीने त्यादिशेने उचललेले पाऊल असेल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo