Samsung Galaxy Note 9 च्या भारतातील लॉन्चची सर्व माहिती
फ्लॅगशिप Galaxy Note 9 च्या हाई-एंड वेरिएंट ची किंमत 84,900 रूपये ठेवण्यात आली आहे.
सॅमसंग च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 9 22 ऑगस्ट ला भारतात लॉन्च केला जाणार आहे, हा लॉन्च इवेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनल वर इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग पण होईल. सॅमसंग ने 9 ऑगस्ट, 2018 ला न्यूयॉर्क मध्ये आयोजित ग्लोबल इवेंट मध्ये डिवाइस सादर केला होता, त्यानंतर या डिवाइसच्या भारतातील किंमतीचा पण खुलासा करण्यात आला होता आणि तद्नंतर डिवाइस प्री-ऑर्डर साठी उपलब्ध झाला.
डिवाइस दोन वेरिएन्ट्स मध्ये विकत घेतला जाऊ शकतो, याच्या बेस वेरिएंट ची किंमत 67,900 रूपये आहे ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तसेच, 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
कंपनी आधी पासून भारतात Galaxy Note 9 साठी प्री-ऑर्डर घेत आहे. जर तुम्ही Galaxy Note 9 प्री-बुक केला तर तुम्ही Gear Sport स्मार्टवॉच 4,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल, ज्याची खरी किंमत 22,990 रूपये आहे. 21 ऑगस्ट पर्यंत प्री-बुकिंग करता येईल आणि अमेजॉन इंडिया ने सांगितले आहे की 23 ऑगस्ट पासून स्मार्टफोन ची शिपिंग सुरू करण्यात येईल.
Gear Sport स्मार्टवॉच वर 4,999 रुपयांच्या डिस्काउंट सोबत कंपनी ने Paytm मॉल सोबत भागेदारी करुन 6,000 रुपयांचा कॅशबॅक पण देऊ केला आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता.
सॅमसंग ने सॅमसंग अपग्रेड प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत जुना फोन एक्सचेंज केल्यास 6,000 रुपयांचा बोनस डिस्काउंट मिळत आहे. भारतात Samsung Galaxy Note 9 चा सेल 23 ऑगस्ट पासून सुरू होऊ शकतो. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सर्व रिटेल आणि ऑनलाइन स्टोर्स वर उपलब्ध होईल.
Note 9 मध्ये 6.4 इंचाचा QHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इंफिनिटी डिस्प्ले आहे आणि याचे रेजोल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. डिवाइस च्या कडेला डेडीकटेड बिक्स्बी बटन पण देण्यात आले आहे. जो कंपनीचा वॉइस बेस्ड असिस्टेंट आहे, जो थोडा बदललेला आहे. डिवाइस चार रंगात म्हणजे, ओशेयन ब्लू, लवेंडर पर्पल, मेटॅलिक कॉपर आणि मिडनाइट ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे.
इतर Galaxy Note लाइनअप प्रमाणे हा डिवाइस पण S पेन सोबत येतो. S पेन मध्ये ब्लुटूथ क्नेक्टिविटी देण्यात आली आहे. Note 9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रॉसेसर आणि 8GB रॅम आहे. भारतीय वर्जन मध्ये एक्सिनोस 9810 प्रॉसेसर असेल. हा सॅमसंग चा पहिला असा फोन आहे जो 512 GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 512 GB पर्यंत वाढवता येईल. डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायर्लेस चार्जिंग ला सपोर्ट करते.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर Note 9 मध्ये 12MP+12MP चा ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे आणि दोन्ही कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS)सोबत येतात. कॅमेरा ऑटो सीन डिटेक्शन सह येतात. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन एंडरोइड 8.0 ओरियो सह सॅमसंग च्या कस्टम UI वर चालतो. पण डिवाइसला एंडरोइड पाय अपडेट कधी मिळेल याची माहिती अजून समोर आली नाही. स्मार्टफोन मध्ये वायर्लेस चार्जिंग व वॉटर आणि डस्ट रेजीस्टेंस साथी IP68 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. कन्नेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये USB टाइप-C, NFC, 3.5mm ऑडियो पोर्ट, ब्लुटूथ 5.0, 4G LTE आणि Wi-Fi सपोर्ट देण्यात आला आहे.