जगातील सर्वात बारीक विंडोज स्मार्टफोन लाँच

जगातील सर्वात बारीक विंडोज स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

ह्याच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनचा अनलॉक्ड व्हर्जन बाजारात ३९,८०० जापानी येन(जवळपास २२,००० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. जपानच्या ह्या कंपनीने अशी घोषणा आले की, सुरुवातीच्या ३००० फोन्ससह ब्लूटुथ की-बोर्ड आणि स्क्रीन प्रोटेक्टरसुद्धा मोफत दिले जातील.

मोबाईल निर्माता कंपनी यमाडा डेंकीने आपला नवीन स्मार्टफोन एव्हरी फोन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हा जगातील सर्वात बारीक स्मार्टफोन आहे. कंपनीने दावा केला आहे की, लूमिया सीरिजच्या बाहेर विंडोज 10 मोबाईलवर चालणारा हा पहिला स्मार्टफोन आहे.

 

ह्याचे साइड प्रोफाईल ६.९mm आहे, याचा अर्थ असा की, हा आयफोन ६ इतका पातळ आहे. हँडसेट परिमाण 154.8×78.6mm आहे आणि ह्याचे वजन १३९ ग्रॅम आहे. तसे ह्याआधी ८.५mm असलेला लूमिया 830 ला सर्वात बारीक विंडोज स्मार्टफोन मानले जात होते. तथापि, मायक्रोसॉफ्टचा लूमिया ९५०(8.2mm) सर्वात बारीक विंडोज फोन बनला.

ह्याच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनचा अनलॉक्ड व्हर्जन बाजारात ३९,८०० जापानी येन(जवळपास २२,००० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. जपानच्या ह्या कंपनी अशी घोषणा आले की, सुरुवातीच्या ३००० फोन्ससह ब्लूटुथ की-बोर्ड आणि स्क्रीन प्रोटेक्टरसुद्धा मोफत दिले जातील.

ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, विंडोज १० मोबाईल चालणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉईंटसारखे अॅप्स आधीच इन्स्टॉल केलेले असतील. एव्हरी फोन विंडोज 10 मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

यमाडा डेंकी एव्हरी फोनमध्ये ५.५ इंचाची HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज असेल. त्याशिवाय ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2600mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. आणि हा 4G LTE ला सपोर्ट करतो.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo