Essential Phone लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. भारतामध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो. Techpp च्या एका रिपोर्ट नुसार, हा फोन भारतात येणार्या काही महिन्यांमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला सादर केला जाऊ शकतो.
भारतात याची किंमत Rs 24,999 असू शकते. आशा आहे की अमेजॉन याचा काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेला “Halo Gray” वेरियंट पण लिस्ट करेल. या फोन मध्ये एज-टू-एज डिस्प्ले, एक मॉड्यूलर प्रणाली ज्याने 360 डिग्री कॅमेरा जोडला जाऊ शकतो आणि 5.7 इंचाचा एलटीपीएस डिस्प्ले 19:10 एस्पेक्ट रेशियो सह मिळेल.
यात दोन 13 मेगापिक्सल चे सेंसर्स सह ड्यूअल प्राइमरी कॅमेरा आणि 2.45 गीगाहर्ट्ज चा ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट एड्रेनो 540 जीपीयू सह आहे. या फोन मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमोरी आहे जी वाढवता येत नाही.