16,000mAh बॅटरी सह Energizer Power Max P16K Pro MWC 2018 मध्ये झाला लॉन्च

Updated on 28-Feb-2018
HIGHLIGHTS

यासोबतच कंपनी ने Power Max P490S आणि Hardcase H590S स्मार्टफोंस पण सादर केले आहेत.

अमेरिकन कंपनी Energizer ही दमदार बॅटरी निर्माता म्हणून ओळखली जाते. आता कंपनी ने MWC 2018 मध्ये आपला नवीन फोन सादर केला आहे, ज्यात कंपनी ने 16,000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनचे नाव Power Max P16K Pro ठेवण्यात आले आहे. याची तुलना जर नव्या Samsung Galaxy S9 सोबत केली तर यात पाच पट जास्त मोठी बॅटरी आहे. 
इतक्या मोठ्या बॅटरी मुळे फोनचे वजन 350 ग्राम आहे. प्राप्त माहिती नुसार P16K Pro ला सप्टेंबर यूरोप मध्ये EUR499 (जवळपास Rs 40,000) च्या किंमतीला सादर केला जाईल. अशा आहे की भारतात हा फोन यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाईल. 
 
यासोबत या फोन मध्ये एक ओक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P25 चिपसेट 6GB च्या रॅम सह देण्यात आला आहे. तसेच यात 128GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये IPS LCD 5.99-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. या फोन मध्ये 16MP+13MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. समोरच्या बाजूस 13MP+5MP चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन एंड्राइड 8.0 ओरियो वर चालतो. 
या सोबत कंपनी ने Power Max P490S ला पण सादर केले आहे, ज्यात 4,000mAh ची बॅटरी आहे. यात 4.95-इंचाचा FWVGA डिस्प्ले आहे. हा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 480×854 पिक्सल आहे. हा फोन एका क्वाड-कोर मीडियाटेक MT6739 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 2GB ची रॅम आणि 16GB ची इंटरनल स्टोरेज आहे. यात दोन्ही बाजूस डुअल कॅमेरा आहे. यात 8MP+0.3MP चा रियर कॅमेरा आहे आणि 5MP+0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 
सोबतच कंपनी ने Hardcase H590S ला पण सादर केले आहे. यात 5.9-इंचाचा फुल HD+ 18:9 आस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले मिळेल. हा फोन मीडियाटेक हेलियो P23 प्रोसेसर आणि 6GB रॅम सह येतो. यात 128GB ची इंटरनल स्टोरेज आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :