स्मार्टफोनला ह्यावेळी 2GB/3GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केले गेले आहे. ह्याची स्टोरेज आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो.
पॅनेसोनिकने आपला स्मार्टफोन एलुगा i2 दोन नवीन प्रकारांत लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीने मागील वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केले होते. स्मार्टफोनला ह्यावेळी 2GB/3GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेजसह लाँच केले गेले आहे. ह्याची स्टोरेज आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो.
हे दोन्ही प्रकार आपल्याला मेटॅलिक सिल्वर, मेटॅलिक गोल्ड आणि मेटॅलिक ग्रे रंगात घेऊ शकतात. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या 2GB रॅमच्या व्हर्जनला आपण ७९९० रुपयात आणि 3GB रॅम व्हर्जनला ८९९० रुपयांत खरेदी करु शकता.
ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5 इंचाची HD डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनसह मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 1GHz क्वा़ड-कोर प्रोसेसर मिळत आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8MP चा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फोनच्या कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल सिमसह 4G, 3G सपोर्ट, ब्लूटुथ 4.0, वायफाय आणि GPS मिळत आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये आपल्याला 2000mAh ची बॅटरी मिळत आहे.