HMD ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर Juho Sarvikas ने Nokia 8 Sirocco, Nokia 1 आणि “banana phone” 8110 च्या सुरवाती प्रोटोटाइप्स चे फोटो शेअर केले आहेत. फोटो मध्ये या डिवाइस च्या डिजाइन ची थोडी झलक बघायला मिळाली आहे आणि हे प्रोटोटाइप्स 3D प्रिंटेड वाटतात. Juho Sarvikas ने 6000 सीरीज एल्युमीनियम ब्लॉक चे फोटो पण पब्लिश केले आहेत ज्यातून Nokia 6 चा शेल बनवण्यात आला आहे.
त्यांनी हे पण सांगितले की या Sirocco फ्लॅगशिप ला इंटरनली एवेंजर कोडनेम देण्यात आले आहे. यात कोणतेही दूमत नाही की Nokia 8 Sirocco HMD चा सर्वात इंट्रेस्टिंग डिवाइस आहे आणि हे स्पष्ट आहे की हा सध्या HMD चा सर्वात पॉवरफुल फ्लॅगशिप डिवाइस आहे. यात ग्लास बॅक देण्यात आली आहे आणि याची फ्रेम स्टेनलेस स्टील ने बनवण्यात आली आहे तसेच P-OLED टेक्निक ने याला एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. यात बारीक बेजल्स आहेत आणि यात 5.5 इंचाचा डिस्प्ले ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 16:9 आहे.
विशेष म्हणजे 8 Sirocco हाच HMD चा एक असा स्मार्टफोन आहे ज्याला ग्लास बॅक देण्यात आली आहे, तर इतर डिवाइसना फुल मेटल यूनीबॉडी डिजाइन किंवा प्लास्टिक बॉडी देण्यात आली आहे. हा HMD चा एकमेव असा डिवाइस आहे ज्याला IP67 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे ज्यामुळे हा डस्ट रेसिस्टेंट आणि वॉटर रेसिस्टेंट बनतो. Nokia 1 बद्दल बोलायचे झाले तर हा मोस्ट-एंट्री-लेवल HMD हँडसेट आहे जो पोलीकार्बोनेट ने बनवण्यात आला आहे आणि याला सिंपल डिजाइन पण कॉम्पॅक्ट साइज देण्यात आली आहे. फीचर फोन 8110 पण पोलीकार्बोनेट ने बनवण्यात आला आहे.