अँड्रॉइड फोनमध्ये Dynamic Island फीचर वापरता येईल.
अँड्रॉइडसाठी या फीचरचा वॉलपेपर लाँच करण्यात आला
डायनॅमिक आयलंड फीचर देणाऱ्या ऍपचे नाव 'dubbed Dynamic Spot'
Apple ने नुकतीच iPhone 14 सीरीज लाँच केली आहे, ज्या अंतर्गत चार नवीन iPhone लाँच करण्यात आले आहेत. iPhone 14 सीरीजच्या प्रो मॉडेलसह Apple ने यावेळी डायनॅमिक आयलंड फीचर दिले आहे. ज्याची खूप चर्चा झाली आहे. Appleने जरी डायनॅमिक आयलंडसाठी वर्षभर संशोधन केले, पण iPhone लाँच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अँड्रॉइड वापरकर्त्यांना हे फीचर मोफत मिळाले.
खरं तर, अँड्रॉइडसाठी एक वॉलपेपर लाँच करण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही अँड्रॉइड फोनमध्ये Dynamic Island फीचर वापरता येईल. डायनॅमिक आयलँड वॉलपेपर इतका लोकप्रिय झाला आहे की, तो केवळ 20 दिवसांत 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केला आहे. अँड्रॉइड फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर प्रदान करणाऱ्या ऍपचे नाव 'dubbed Dynamic Spot' असे आहे. तुम्ही हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकता.
Dynamic Island म्हणजे काय?
डायनॅमिक आयलंड हे Appleने नवीन नॉच डिझाइन म्हणून सादर केले आहे. नोटिफिकेशन किंवा कॉल किंवा म्युझिक प्ले होत असताना नॉचचा शेप बदलत राहतो. नॉच हा डिस्प्लेचा भाग आहे जिथे कटआउट आहे. एकूणच, डायनॅमिक आयलंडच्या मदतीने ऍप्पलने iPhoneच्या डिस्प्लेसह अतिरिक्त जागा दिली आहे. लाँच झाल्यापासून Dynamic Island फिचरला यूजर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.