डुअल 4G सपोर्ट सह 7,499 रुपयांच्या किंमतीत iVoomi i2 झाला लॉन्च

Updated on 22-May-2018
HIGHLIGHTS

iVoomi i2 ची किंमत 7,499 रूपये आहे आणि आज पासून हा डिवाइस फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.

iVoomi ने मागच्या वर्षी भारतीय बाजारात iVoomi i1 सोबत पहिले पाऊल टाकले होते आणि आता कंपनी ने या डिवाइस ची जागा घेण्यासाठी नवीन डिवाइस IVoomi I2 लॉन्च केला आहे. iVoomi i2 7,499 रूपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि हा आज पासून फक्त ई-कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. या डिवाइस ची सर्वात मोठी खासियत या किंमतीत डुअल 4G आणि VoLTE सपोर्ट ही आहे. iVoomi च्या या डिवाइस मध्ये मीडियाटेक MT6739 चिपसेट आहे आणि हा डिवाइस मध्ये 18:9 डिस्प्ले, 4000mAh बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा आहे तसेच एक चांगला लुक पण देतो. 
स्पेसिफिकेशन्स 
iVoomi ने हा स्मार्टफोन फक्त एका वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे आणि यात 5.45 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे. iVoomi i2 मीडियाटेक MTK6739 SoC द्वारा संचालित आहे जो एक क्वॉड-कोर चिपसेट आहे आणि याचे चारही कोर्स 1.5GHz वर क्लोक्ड आहेत. 
डिवाइस मध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रो एसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये हाइब्रिड कार्ड स्लॉट आहे, त्यामुळे एका स्लॉट मध्ये एक तर सिम कार्ड वापरू शकता किंवा माइक्रो एसडी कार्ड वापरू शकता. 
कॅमेरा 
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅक वर 13MP आणि 2MP चा डुअल कॅमेरा आहे आणि कॅमेरा अॅप बोकेह मोड, वाइड-एंगल मोड, HDR पनोरमा मोड ऑफर करतो. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8MP चा कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सॉफ्ट LED फ्लॅश सह येतो तर फ्रंट कॅमेरा सोबत कोणताही LED फ्लॅश नाही. 
कनेक्टिविटी
कनेक्टिविटी साठी हा डिवाइस दोन्ही सिम कार्ड्स मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि एक माइक्रो USB पोर्ट ऑफर करतो. या स्मार्टफोन ची इतर खास बाब ही आहे की हा एंड्राइड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे आणि हा डेडिकेटेड फेस अनलॉक फीचर सह येतो. डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे आणि हा स्मार्टफोन USB OTG सपोर्ट सह येतो. 
किंमत आणि उपलब्धता
iVoomi i2 ची किंमत 7,499 रूपये आहे आणि आज पासून हा डिवाइस फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. तुम्ही हा डिवाइस इंडिगो ब्लू आणि ओलिव ब्लॅक कलर मध्ये घेऊ शकता. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :