बाजारात आला आणखी एक फ्रीडम 251? DOCOSS X1 स्मार्टफोन लाँच, किंमत ८८८ रुपये
फ्रीडम 251 स्मार्टफोननंतर बाजारात आणखी एक स्मार्टफोन झाला आहे, ज्याचे नाव आहे DOCOSS X1. आता हा तरी स्मार्टफोन मिळणार का की हा सुद्धा एक स्कॅम असेल?
फेब्रुवारीमध्ये जेव्हा फ्रीडम 251 स्मार्टफोन भारतात लाँच झाला होता, तेव्हा संपूर्ण स्मार्टफोन निर्माता कंपनी आणि सर्व लोक विचारात पडले होते की, केवळ २५१ रुपयात मिळणारा स्मार्टफोन आपल्यापर्यंत कसा काय पोहोचेल. त्यानंतर अनेक दिवस त्याविषयी वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत होत्या. त्यानंतर ह्याचे काय झाले ह्याबाबत कोणालाच निश्चित माहिती नाही. आणि आता पुन्हा एकदा फ्रीडम 251 चा पाढा गिरवत बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच झाला आहे, ज्याची किंमत केवळ ८८८ रुपये आहे. हा स्मार्टफोन आहे DOCOSS X1. ह्याला भारतातील जयपूर आधारित कंपनी DOCOSS ने बनवले आहे. कंपनीच्या प्रोमोमध्ये असे सांगितले गेले आहे की, हा स्मार्टफोन 2 मे पासून मिळणे सुरु होईल. आणि ह्याची प्री-बुकिंग शुक्रवारी बंद होईल.
तथापि ह्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग चालू आहे.मात्र आमचा लोकांना हाच सल्ला असेल, की ह्या डीलपासून जरा लांबच राहा. कारण ह्याबाबत अजूनपर्यंत तरी काही निश्चित सांगितले जाऊ शकत नाही.
ह्या स्मार्टफोनची किंमत ८८८ रुपये ही टॅक्सशिवाय लिस्ट केली आहे. मात्र हा स्मार्टफोन नेमका किती किंमतीत मिळेल, ते अजूनपर्यंत सांगितले गेले नाही.
तथापि आम्ही ह्याच्या अधिकृत साइटवर जाऊन हा स्मार्टफोन बुक करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. आता पाहायचे हे आहे की, किती लोकांनी हा स्मार्टफोन बुक केला आहे आणि तो त्यांना मिळणार आहे की नाही. ह्या स्मार्टफोनच्या लाँचला सर्वात आधी फोनरडारने कवर केले होते. त्यानंतर ही बातमी समोर आली.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या साइटवर एक नंबर दिला आहे 7666204430 , ज्याच्या माध्यमातून आपण ह्या फोनला SMS च्या माध्यमातून बुक करु शकता. मात्र येथेही अनेक प्रश्न उपस्थित होतात. कंपनीच्या फेसबुक पोस्टवरुनही हेच समोर आले आहे की, ह्याला SMS च्या माध्यमातून बुक करु शकता.
Docoss X1 pic.twitter.com/UORLqklvcW
— Docoss (@DocossSocial) April 27, 2016
To book your order type "Your Name Address and pincode" send it to 7666204430
Kindly do not call on the SMS number.— Docoss (@DocossSocial) April 27, 2016
— Docoss (@DocossSocial) April 27, 2016
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची WVGA डिस्प्ले, 1.2GHz ड्यूल-कोर प्रोसेसर, 1GB रॅम, 4GB रोम ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो. त्याशिवाय ह्यात आपल्याला 1300mAh ची बॅटरी मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रियर आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर चालतो.
हेदेखील वाचा – आकर्षक डिझाईन्समुळे हे स्मार्टफोन्स आहेत स्वत:तच काही खास!
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile