iPhone युजर्स सावधान! चुकूनही ‘ही’ कॅरेक्टर्स फोनवर टाइप करू नका, अन्यथा…

 iPhone युजर्स सावधान! चुकूनही ‘ही’ कॅरेक्टर्स फोनवर टाइप करू नका, अन्यथा…
HIGHLIGHTS

iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी पुढे आली आहे.

हा बग iOS 17 वर काम करणाऱ्या iPhones मध्ये दिसला आहे.

चुकूनही तुमच्या फोनवर 'हे' कॅरेक्टर्स टाईप करू नका.

तुम्ही iPhone यूजर असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आयफोनमध्ये एक लेटेस्ट बग दिसला आहे. अम्ही तुम्हाला सांगतो की, हा बग टाळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लिंक किंवा अपडेटपासून दूर राहण्याची गरज नाही. त्याऐवजी, हा बग टाळण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPhone मध्ये विशिष्ट कॅरेक्टर्स टाइप करणे टाळण्याची गरज आहे. हा नक्की कोणता बग आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती-

Also Read: Smartphone Buying Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी घ्या तपासून, अन्यथा होईल पश्चाताप

iPhone बग

iPhone मध्ये नवीनतम बग आढळून आला आहे, ज्यामध्ये फक्त काही अक्षरे टाइप केल्याने तुमचा फोन क्रॅश होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही आयफोन वापरकर्ते असाल तर तुम्ही देखील याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रिपोर्ट्सनुसार, हा बग iOS 17 वर काम करणाऱ्या iPhones मध्ये दिसला आहे. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, सध्या Apple ने या बगबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही.

चुकूनही 'ही' कॅरेक्टर्स iPhone वर टाइप करू नका, अन्यथा तुमचा फोन होईल क्रॅश

मिळालेल्या अहवालानुसार, सिक्योरिटी रिसर्चर Mastodon यांनी या बगशी संबंधित तपशील उघड केला आहे. संशोधकाच्या मते, यूजर्स iPhone सहज क्रॅश करू शकतात. जर युजर्सने आयफोनच्या ॲप लायब्ररीमध्ये जाऊन सर्च बारमध्ये “” :: टाइप केले’, तर तुम्ही हे कॅरेक्टर्स टाइप करताच तुमचा iPhone क्रॅश होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, ही क्रॅश आणि रीबूट समस्या iOS 17 वर चालणाऱ्या iPhones मध्ये दिसली आहे. जर तुम्ही iPhone युजर असाल, तर हा बग टाळण्यासाठी तुमच्या iPhone मध्ये वर नमूद केलेले कॅरेक्टर्स टाइप करणे टाळा.

Apple कडून अधिकृत प्रतिक्रिया नाही.

मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील टिपस्टरमध्ये या बगशी संबंधित अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप Apple ने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. होय, कंपनीने अधिकृतपणे या बगबद्दल कोणतीही माहिती दिली नाही किंवा त्याचे निराकरण करण्याबाबत कोणतेही विधान सुद्धा जारी केले नाही. त्यामुळे जोवर याबद्दल खात्रीशीर काहीही कळत नाही, तोवर तुमच्या iPhone वर हे अक्षर टाइप करणे टाळा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo