Xiaomi ची दिवाळी निमित्त जबरदस्त ऑफर ! स्वस्त स्मार्टफोन्सवर मिळेल सर्वात मोठी डील

Updated on 20-Oct-2022
HIGHLIGHTS

Xiaomi चा Diwali With Mi Sale लाईव्ह

दिवाळीनिमित्त Xiaomi स्मार्टफोन्सवर देतेय सर्वोत्तम डील्स

प्रचंड सवलतीसह खरेदी करा Redmi 9 Active

जर तुम्ही एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Xiaomi चा Diwali With Mi Sale तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर या सेलमध्ये तुम्हाला बंपर डिस्काउंटसह उत्कृष्ट फीचर Redmi 9 Active हँडसेट खरेदी करता येईल. 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत सध्या Xiaomi च्या वेबसाइटवर 8,099 रुपये आहे. 

हे सुद्धा वाचा : Pathaan Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळेल गिफ्ट, टीझर होणार का रिलीज?

मात्र, फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ICICI बँकेच्या कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंत फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. त्याबरोबरच, जर तुमच्याकडे बँक ऑफ बडोदाचे डेबिट कार्ड असेल, तर तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंतची झटपट सूट देखील मिळणार आहे. 

Redmi 9 Active

फोनमध्ये, कंपनी 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53-इंच लांबीचा HD + डॉट ड्रॉप डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह 400 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. फोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Helio G35 चिपसेट देत आहे.

AI फेस अनलॉक आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज, ड्युअल सिम, 4G, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, FM रेडिओ, GPS, GLONASS, BEIDOU आणि मायक्रो USB चार्जिंग पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स या फोनमध्ये दिले आहेत. 

या व्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी कंपनीने यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याबरोबरच, कंपनी आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :