digit zero1 awards

 Digit Zero1 Awards 2023: 50 हजार रुपयांहुन अधिक किमतीत येणारा Best Performing Premium Smartphone

 Digit Zero1 Awards 2023: 50 हजार रुपयांहुन अधिक किमतीत येणारा Best Performing Premium Smartphone

Flagship स्मार्टफोन अत्याधुनिक नावीन्यपूर्णतेचे प्रतिनिधित्व करतात. एवढेच नाही तर, हे Premium smartphones आश्चर्यकारक फीचर्स आणि अत्याधुनिक कामगिरी देतात. फ्लॅगशिप मोबाईल फोन पाहिले तर हे स्मार्टफोन्स तंत्रज्ञानाच्या शिखराचे प्रतीक आहेत, जे मोबाईलचे सतत विकसित होत असलेले लँडस्केप प्रतिबिंबित करतात. त्यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे हे स्मार्टफोन इतरांपेक्षा वेगळे बनतात. याशिवाय, हे Flagship स्मार्टफोन्स स्मार्टफोनचे भविष्य निश्चित करण्यासाठी देखील ओळखले जातात.

लेटेस्ट प्रोसेसरपासून ते अप्रतिम डिस्प्लेपर्यंत, हे फोन अनेक अद्वितीय वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतात. त्याचप्रमाणे यामध्ये कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स, बॅटरी आणि अगदी सॉफ्टवेअर इ. वैशिष्ट्यांसह सादर केले जातात. जे काही कालावधीनंतर हळूहळू मिड रेंज किंवा बजेट रेंजच्या स्मार्टफोनमध्ये येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोनचा अंतिम अनुभव शोधत असलेल्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही उपकरणे तयार केली आहेत.

Digit Zero1 Award Winner: Samsung Galaxy Z Fold 5

Samsung Galaxy Z Fold 5 premium smartphones
Samsung Galaxy Z Fold 5

Samsung Galaxy Z Fold 5 हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन वर सांगितलेल्या सर्व वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या फोनचे डिझाईन आणि अनुभव मागील Samsung Galaxy Z Fold 4 सारखेच आहे. मात्र, त्याची कार्यक्षमता आणि इतर फीचर्सची तुलना मागील व्हेरिएंटसह करता येणार नाही. लक्षात घ्या की, या फोनला लेटेस्ट iPhone 15 Pro, iQOO 11 आणि इतर फोन्सकडून कठीण स्पर्धा मिळतेय. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Samsung Galaxy Z Fold 5 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. येथून खरेदी करा

Digit Best Buy Award Winner: iQOO 11

digit zero1 awards best performing flagship smartphones

2023 मध्ये लॉन्च झालेल्या या फोनमध्ये iQOO च्या परफॉर्मन्स आणि गेमिंगचा चांगलंच मेळ दिसत आहे. iQOO 11 स्मार्टफोनची किमंत 59,999 रुपये इतकी आहे. iQOO 11 हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह भारतात लाँच झालेला पहिला फोन होता. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आहे. जरी वरील फोन काही बाबतीत iQOO 11 ला मागे टाकत असेल तरीही या स्मार्टफोनला या किंमतीत उत्कृष्ट परफॉर्मर म्हणता येईल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo