Digit Zero1 Awards 2023: बेस्ट परफॉरमिंग कॅमेरा स्मार्टफोन, कुणाला मिळाले विजेतेपद? बघा सविस्तर
कॅमेरा हा स्मार्टफोनचा सर्वात वेगाने अपडेट होणारा भाग आहे. एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, आपण जास्तीत जास्त लोक सर्वप्रथम कॅमेरा सेक्शनची माहिती काढतात. आधीपेक्षा स्मार्टफोनच्या कॅमेराद्वारे फोटोग्राफी करणे आणि फोटोग्राफीची शैली देखील अपडेट झाली आहे.
दरम्यान, 2023 मध्ये आम्ही पुन्हा एकदा सॉफ्टवेअर इमेज प्रोसेसिंगमधील सुधारणांसह कॅमेरा स्पेसमध्ये AI टेक सेंटर स्टेजला पाहिले गेले. त्याबरोबरच, आपण कॅमेरा हार्डवेअरमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रगती पाहिली. तसेच, 1-इंच सेन्सर देखील या वर्षी अधिक सामान्य झाले, ज्यामुळे लो लाईट फोटोंची कमतरता भरून निघाली आहे.
एवढेच नाही तर, विशेषतः फोल्डेबल फोनमध्ये – पिक्सेल-स्टॅकिंग कॅमेरे सादर केले गेले. उद्योगातील दिग्गजांनी विक्रम प्रस्थापित करणे सुरू ठेवले. चला तर मग पाहूया की कोणता फोन सर्व स्पर्धकांना मागे टाकून Digit Zero1 Awards ची ट्रॉफी जिंकला आहे.
Digit Zero1 Award 2023 Winner: Apple iPhone 15 Pro
या वर्षी, iPhone 15 Pro दोन मुख्य कारणांमुळे अनेक पटींनी सुधारला गेला आहे. सर्व प्रथम फोनचा 48MP क्वाड-बायर सेन्सर 24MP मध्ये इमेज सेव्ह करतो. ज्यामध्ये संपूर्ण 48MP इमेज आणि 4x बिन केलेल्या 12MP इमेज समाविष्ट आहेत.
इतक्यातच या फोनच्या कॅमेरा विभागातील विशेषता संपत नाही तर, तुम्हाला त्याच्या कॉलिटीमध्ये देखील सुधारणा दिसेल. याशिवाय, गेल्या वर्षीच्या iPhones च्या HDR समस्याही कमी झाल्या आहेत. आपण iPhone 15 Pro लेन्सच्या डायनॅमिक रेंजमध्ये सुधारणा देखील पाहिल्या आहेत.
याशिवाय, त्यांचे कलर्स एकदम ट्रू-टू-लाइफ दिसतात. तर, पोर्ट्रेट उत्कृष्ट एज डिटेक्शनसह वास्तववादी बोकेह इफेक्ट देतात आणि लो लाईटमध्ये फोटोग्राफी देखील उत्तम आहे. ऍपलचा सर्वात मजबूत मुद्दा म्हणजे त्याचा व्हिडिओ जो सिनेमॅटिक मोडच्या जोडणीसह आणखी चांगला होतो आणि आता LOG एन्कोडिंग इ. समर्थनासह 4K मध्ये 30 fps वर उपलब्ध आहे.
iPhone 15 Pro मध्ये सर्वात विश्वासार्ह कॅमेरा सिस्टम आहे. या सर्व फीचर्समुळे हा स्मार्टफोन Digit Zero1 Awards चा विजेता बनला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,41,991 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा
पहिला उपविजेता: Vivo X90 Pro
Vivo X90 Pro ची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. मात्र, Apple ने सर्वात सुसंगत आणि विश्वासार्ह कॅमेरा स्मार्टफोन होण्याचा मुकुट घेतला आहे. त्यामुळे Vivo X90 Pro हा लो-लाइट फोटोग्राफीमध्ये विजेता म्हणून उदयास आला आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये Zeiss ब्रँडिंगसह 1-इंच लांबीचा सेन्सर आहे. येथून खरेदी करा
दुसरा पहिला उपविजेता: Samsung Galaxy S23 Ultra
Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे. हा फोन 2023 मध्ये लाँच झालेल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सपाकी एक आहे. कॅमेरा स्मार्टफोन श्रेणीमध्ये तो अजूनही ग्राहकांची सर्वोच्च शिफारस आहे. या फोनमध्ये चार अतिशय उत्कृष्ट कॅमेरे देण्यात आले आहेत. Galaxy S23 Ultra मध्ये या वर्षातील सर्वोत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट अल्ट्रावाइड कॅमेरा आहे, जो बेस्ट कलर्स आणि डायनॅमिक रेंज ऑफर करतो. येथून खरेदी करा
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile