आजचे युग हे स्मार्टफोनचे आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. वॉटर रेसिस्टन्स, वॉटर प्रूफ किंवा डस्ट प्रूफ किंवा वॉटर रिपेलेंट इ. पण वॉटरप्रूफ असणं आणि फोन वॉटर रेझिस्टंट असणं यात काय फरक आहे ? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे, ते सांगणार आहोत…
हे सुद्धा वाचा : Lava Blaze 5G चा 6GB रॅम व्हेरिएंट भारतात लाँच, सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन
येथे लक्षात ठेवा की वॉटर रेसिस्टेंट म्हणजे वॉटरप्रूफ नाही. वॉटर रेझिस्टंट म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी जाणे अवघड आहे. दुसरीकडे फोनवर काही थेंब पडले तरी इजा होणार नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की फोन पाण्यात बुडवून ठेवल्यास त्याचे नुकसान होणार नाही. अशा परिस्थितीत फोनचे नुकसान नक्कीच होईल.
जर तुम्ही अशा कंपनीचा स्मार्टफोन घेत असाल, जो वॉटरप्रूफ असल्याचा दावा करत असेल, तर याचा अर्थ तुमचा फोन पाण्यातही सुरक्षित असेल. असा फोन तुम्ही पाण्याखाली वापरू शकता आणि फोटोग्राफीही करू शकता.
जर तुमचा फोन वॉटर रिपेलेंटने सुसज्ज असेल तर, तुमच्या स्मार्टफोनवर एक पातळ थर बसवला गेला आहे, जो फोनमध्ये पाणी जाऊ देणार नाही. ही फिल्म फोनच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी पेस्ट केली आहे. या टेक्नॉलॉजी साठी, बहुतेक कंपन्या हायड्रोफोबिक पृष्ठभाग तयार करतात आणि लागू करतात.