डिटेलने झेड-टॉक ऍप सह फीचर फोनची नवीन सीरीज केली सादर
डिटेल आपल्या नवीन सीरीज सह फीचर फोनच्या जगात हंगाम कारण्यास पूर्णपणे तयार आहे
आपल्या नवीन सीरीज अंतर्गत या ब्रँडने डी1 चॅम्प, डी1 गुरु, डी1 स्टार तसेच डी1 मॅक्स नावाचे चार मॉडेल सादर केले आहेत
जगात सर्वात स्वस्त फीचर फोन सादर केल्यानंतर डिटेल आता झेड—टॉक ऍपने सुसज्ज असलेली आपली नवीन सीरीज सादर करत फीचर फोन बाजारात हंगाम करण्याच्या तयारीत आहे. या ऍप मधून उपभोक्ता आपल्या फीचर फोन वरून कोणत्याही एंड्रायड किंवा आईओएस स्मार्टफोन युजर्सशी चॅट करू शकतात आणि मीडिया शेयर करू शकतात. कंपनीने आपल्या नवीन सीरीज अंतर्गत चार मॉडेल— डी1 गुरु, डी1 चॅम्प, डी1 स्टार आणि डी1 मॅक्स आणले आहेत ज्यांची किंमत क्रमश: 625 रुपये, 649 रुपये, 799 रुपये आणि 999 रुपये आहे. नवीन सीरीज डिटेलच्या वेबसाइट आणि ऍप तसेच फ्लिपकार्ट, ऍमेझॉन तसेच पेटीएम मॉल सारख्या ई—कॉमर्स साइट्स वर उपलब्ध आहे.
या फीचरफोनच्या जगात पहिल्यांदा डिटेलने फक्त 1,000 रुपयांच्या आत इन्स्टंट मेसिजिंग ऍप झेड—टॉक असेलेले नवीन फोन सादर केले आहेत. डिटेलच्या डी1 गुरु आणि चॅम्प मध्ये 1.8'' चा एलसीडी डिस्प्ले आहे तर डिटेल डी1 स्टार आणि मॅक्स मध्ये क्रमश: 2.4'' आणि 2.8'' चा एलसीडी डिस्प्ले आहे. चारही मॉडेल डुएल सिम ने सुसज्ज आहेत. हे फोन डिजिटल कॅमेरा, वायरलेस एफएम, कॉल ब्लॅकलिस्ट, पावर सेविंग मोड, एसओएस आणि टॉर्च सारख्या आकर्षक फीचर्स सह येतात.
कंपनीने डी1 स्टार आणि मॅक्स मध्ये 'ब्लूटूथ—डायलर' फीचर पण दिला आहे. या स्मार्ट फीचरच्या मदतीने तुम्ही स्टार आणि मॅक्सशी तुमचा स्मार्टफोन अगदी सहा जोडू शकता आणि कॉल, एसएमएस तसेच म्यूजिक कनेक्ट करू शकतात ज्यमुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल.
याप्रसंगी डिटेलचे संस्थापक योगेश भाटिया म्हणाले, 'आम्ही भारतीय फीचर फोन बाजारात एक मनमोहक प्रवास पूर्ण केला आहे आणि गेल्या काही वर्षात एकपेक्षा एक अद्वितीय 'व्हॅल्यू फॉर मनी' प्रोडक्ट सादर केले आहेत. नवीन डिवाइस आधुनिक जगाची गरज आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात ठेऊन डिजाइन केले गेले आहेत. हि नवीन सीरीज 40 कोटी भारतीयांना एकमेकांशी जोडण्याचे आमचे उद्देश्य अजून मजबूत करेल.'
चांगल्या क्वालिटीच्या या नवीन सीरीज मध्ये आवाज आणि म्युजिकला सर्वश्रेष्ठ क्वालिटी देण्यासाठी विशेष टेक्निकल फीचर्स देण्यात आले आहेत. या सीरिजने डिटेल नवीन फीचर्स आणि मूल्य यांचे संतुलन राखत आपल्या फीचर फोन पोर्टफोलियोचा विस्तार करत आहे.