एका सर्वसामान्य माणसाला विचारले की तुमच्याजवळ चपलांचे जोड किती? किंवा एखाद्या श्रीमंत माणसाला तुमच्याजवळ चपलांचे जोड किती? तरी कोणीही तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. कारण लोकांना आपल्या चपलांच्या बाबतीत नेहमी काही ना काहीतरी नवीन करावेसे वाटते. अशातच जर आम्ही तुम्हाला सांगितले की, आता आपले बूट आपल्याला कधीच जुने वाटणार नाही,तर तुम्हाला प्रश्न पडेल असे कसे काय होऊ शकते? पण हे खरे आहे.
खरे पाहता बाजारात असा एक बूट विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्याचे डिझाईन एका अॅपद्वारे बदलता येईल.ह्या बूटांच्या लूकला एका स्मार्टफोनच्या माध्यमातून कस्टमाइज केले जाऊ शकते. डेविड कोलोने शिफ्टवियर नावाचा हा प्रोटोटाइप बनवला आहे, ज्याला ई-पेपर लावला आहे. शिफ्टवियर बनवणारे डेविड कोलो यांचा दावा आहे की, ह्या बूटांवर अनेक प्रकारचे अॅनिनमेटेड ग्राफिक्स चालवू शकता. हा बूट वॉक अँड चार्जच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
डेविडने ह्या बूटांच्या प्रोडक्शनला पैसे जमवण्यासाठी ह्याला क्राउडफंडिंग वेबसाइटवर टाकले आहे, जेथे त्यांनी लोकांकडून $2,50,000 (जवळपास १ करोड ६६ लाख रुपये) मागितले आहे. जर हे टार्गेट पुर्ण झाले तर, तो बाजारात ह्या बूटाची किमत $150 (जवळपास १० हजार रुपये) पासून सुरु होईल. जर आपण ह्या बूटांना घेऊ इच्छिता, तर आपण शिफ्टवेअरच्या वेबसाइटवर घेऊ शकता. येथे हे बूट प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे.