Creo ने आपल्या मार्क 1 स्मार्टफोन केले नवीन सॉफ्टवेअर अपडेट
Creo मार्क 1 स्मार्टफोनला ह्याच वर्षी एप्रिलमध्ये लाँच केले गेले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत हा स्मार्टफोनला तिस-यांदा अपडेट मिळत आहे.
Creo प्रत्येक महिन्याप्रमाणे ह्या महिन्यात आपल्या मार्क 1 स्मार्टफोनसाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. हे अपडेट ह्या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये झाले आहे. हा फ्यूल OS वर चालतो. हे या स्मार्टफोनला मिळालेले तिसरे अपडेट आहे. ह्या स्मार्टफोनला ह्याच वर्षी एप्रिलमध्ये लाँच केले गेले होते, त्यावेळी ह्या स्मार्टफोनला दर महिना अपडेट केले जाईल असे सांगण्यात आले होते.
CREO Mark 1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. फोन 1.95GHz मिडियाटेक हेलिओ X10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळते. फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड सपोर्टसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा दिला गेला आहे, ज्याने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगकेली जाऊ शकते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेली आहे. स्मार्टफोन 3100mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २१ तासांचा टॉकटाइम देते. ह्यात फास्ट चार्जिंगचासुद्धा सपोर्ट आहे आणि १० मिनिटांच्या चार्जिंगने हा दोन तासांचा टॉकटाइम देतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट, 4G LTE सपोर्ट, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सुद्धा मिळते.
हेदेखील वाचा – आयडिया पुन्हा एकदा कमी केले आपले डाटा रेट्स
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?