स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट
HIGHLIGHTS

क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत ३० टक्क्यांची घट झाली असून, नवीन किंमतीनुसार, हा स्मार्टफोन ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत मिळेल.

देशामध्ये यंदा ७० वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे आणि ह्याचेच औचित्य साधून क्रिओ ने आपल्या आकर्षक स्मार्टफोन मार्क 1 वर 30 टक्क्यांची घट केली आहे. म्हणजेच आता हा स्मार्टफोन १३,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध होईल. आणि ह्याआधी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीवर लक्ष दिले तर, ह्या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये होती. म्हणजेच ह्या स्मार्टफोनमध्ये ६००० रुपयाची मोठी घट केली आहे आणि हा स्मार्टफोन ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत मिळणार आहे.

 

CREO Mark 1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. फोन 1.95GHz मिडियाटेक हेलिओ X10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
 

फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळते. फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड सपोर्टसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकतो.
 


 

फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा दिला गेला आहे, ज्याने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगकेली जाऊ शकते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेली आहे. स्मार्टफोन 3100mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २१ तासांचा टॉकटाइम देते. ह्यात फास्ट चार्जिंगचासुद्धा सपोर्ट आहे आणि १० मिनिटांच्या चार्जिंगने हा दोन तासांचा टॉकटाइम देतो.
 

हेदेखील वाचा – आसूस झेनफोन सेल्फी ZD551KL लाँच, १२,९९९ रुपयाच्या किंमतीत अॅमेझॉनवर उपलब्ध

हेदेखील वाचा – LeEco भारतात लाँच केले तीन नवीन 4K UHD टीव्ही, किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo