हा भारतात १९,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे जर आपण ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवरुन घेतलात ,तर आपण ह्या फोनच्या बाजूला आपल्या आवडीचा कोणताही संदेश लिहू शकाल.
काही दिवसांपूर्वीच मोबाईल निर्माता कंपनी Creo ने आपला नवीन स्मार्टफोन Mark 1 भारतात लाँच केला होता आणि आता हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केलेे गेले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरही हा मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, हा भारतात १९,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे जर आपण ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवरुन घेतलात ,तर आपण ह्या फोनच्या बाजूला आपल्या आवडीचा कोणताही संदेश लिहू शकाल. हा पर्याय फक्त पहिल्या 2000 यूजर्ससाठीच मोफत असेल.
CREO Mark 1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. फोन 1.95GHz मिडियाटेक हेलिओ X10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळते. फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड सपोर्टसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकतो.
फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा दिला गेला आहे, ज्याने 4K व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेली आहे. स्मार्टफोन 3100mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २१ तासांचा टॉकटाइम देते. ह्यात फास्ट चार्जिंगचासुद्धा सपोर्ट आहे आणि १० मिनिटांच्या चार्जिंगने हा दोन तासांचा टॉकटाइम देतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट, 4G LTE सपोर्ट, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सुद्धा मिळते.