CREO Mark 1 स्मार्टफोन: दर महिना स्वत:च अपडेट करणार ऑपरेटिंग सिस्टम
कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईडवर आधारित ऑपरेटिंग सिस्टम फ्यूलवर चालतो. ह्या फोनचे ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक महिन्यात अपडेट होणार आणि ह्यात एक खूपच उत्कृष्ट असे नवीन फीचर दर महिन्यात सामील होणार.
मोबाईल निर्माता कंपनी CREO ने भारतात आपला नवीन फोन Mark 1 लाँच केला आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईडवर आधारित ऑपरेटिंग सिस्टम फ्यूलवर चालतो. ह्या फोनचे ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक महिन्यात अपडेट होणार आणि ह्यात एक खूपच उत्कृष्ट असे नवीन फीचर दर महिन्यात सामील होणार आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
त्याचबरोबर कंपनीने एक प्रमोशन ऑफरसुद्धा सुरु केली आहे. ह्याच्या अंतर्गत यूजर स्मार्टफोनच्या एक कडेला तुम्ही तुमच्या आवडीचे टेक्स्टसुद्धा लिहू शकता. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लिहिलेल्या टेक्स्टसह मोबाईलच्या लूकचे परीक्षण करु शकता.
हेदेखील पाहा – शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!
CREO Mark 1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. फोन 1.95GHz मिडियाटेक हेलिओ X10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळते. फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड सपोर्टसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकतो.
फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा दिला गेला आहे, ज्याने 4K व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेली आहे. स्मार्टफोन 3100mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २१ तासांचा टॉकटाइम देते. ह्यात फास्ट चार्जिंगचासुद्धा सपोर्ट आहे आणि १० मिनिटांच्या चार्जिंगने हा दोन तासांचा टॉकटाइम देतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट, 4G LTE सपोर्ट, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सुद्धा मिळते.
हेदेखील वाचा – शाओमी Mi पॅड 7.9 विरुद्ध लेनोवो टॅब S8
हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज आहे मिजू प्रो 6 स्मार्टफोन